shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर तालुका व परिसरातील अवैध धंदे तात्काळ बंद करा; नितीन शिंदे*

*इंदापूर तालुका व परिसरातील अवैध धंदे तात्काळ बंद करा; नितीन शिंदे*
     इंदापूर प्रतिनिधी:  इंदापूर तालुक्यामध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर अवैध धंद्यांचा सुळसुळाट चालू असून त्यामध्ये मटका, दारू, जुगार ,गांजा, गुटखा, ताडी विक्री, कत्तलखाने, अवैध मुरूम वाहतुक  इत्यादी व्यवसाय करणाऱ्यांनी कहर केला आहे. अशा अनेक सर्वसामान्य लोकांच्या तक्रारी इंदापूर शिवसेनेच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये तसेच फोन द्वारे आमच्याकडे आले आहेत अशी माहिती तालुकाप्रमुख नितीनजी शिंदे यांनी दिली. त्याचा मानसिक त्रास इंदापूर व परिसरातील सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात होत आहे. सदर अवैध धंदे करणारे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले लोक असल्याने त्यांच्याविरुद्ध तक्रार करण्यास नागरिक धजावत नाहीत, कोणी तक्रार करायला पुढे आले तर अशा लोकांना तुमच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली जात आहे त्यामुळे नागरिक खूप हैराण झाली आहेत. 
         तोंडावरच गणपती उत्सव, नवरात्र उत्सव असे अनेक सण येत आहेत, अशा लोकांमुळे समाजात दहशत पसरली आहे तरी या लोकांवर व या व्यवसायावर कडक कारवाई करावी. अन्यथा इंदापूर तालुका शिवसेनेच्या वतीने आपल्या कार्यालयासमोर महिला, पुरुष व नागरिकांसह तीव्र आंदोलन करण्यात येईल याची आपण गांभीरपूर्वक दखल घ्यावी.
       जर आंदोलन करण्याची वेळ आली तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो त्याला पूर्णतः आपण जबाबदार असाल असे तालुकाप्रमुख नितीन शिंदे यांनी सांगितले.
            यासंदर्भात आज इंदापूर तालुका शिवसेनेच्या वतीने पोलीस उपाधीक्षक गणेश इंगळे साहेब यांना निवेदन देऊन चालू असलेले सर्व अवैध धंदे तात्काळ बंद करण्यात यावेत अशी मागणी केली आहे. यावेळी चर्चा करताना पोलीस उपाधीक्षक गणेश इंगळे साहेब यांनी असे जर कुठे इंदापूर तालुक्यामध्ये अवैध धंदे चालू असतील तर त्या त्या भागातील नागरिकांनी ह्या अवैध धंदे करणाऱ्यांच्या विरोधात समोर येऊन पोलीस स्टेशन शी संपर्क साधावा किंवा सदर अवैध धंद्यांचा व्हिडिओ शूट करून तो शिवसेना संपर्क कार्यालय इंदापूर किंवा इंदापूर पोलीस स्टेशन यांना पाठवावा असे आवाहन त्यांनी केले आहे आणि आपण लवकरच या संदर्भात वरिष्ठ आणि इंदापूर पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी यांच्यासोबत चर्चा करून कडक पावले उचलू असे आश्वासन त्यांनी दिले आहे.
          यावेळी शिवसेना पुणे जिल्हा समन्वयक विशाल बोंद्रे, तालुकाप्रमुख नितीन शिंदे, शिवसेना इंदापूर शहर प्रमुख महादेव सोमवंशी, तालुका समन्वयक अरुण पवार, विभाग प्रमुख हेमंत भोसले, उपशहर प्रमुख अशोक देवकर तसेच इतर शिवसैनिक  संख्येने उपस्थित होते.
close