श्रीमती हिराबाई हरिभाऊ देसाई विद्यालय
बेलवाडी मध्ये क्रिडा दिवस उत्साहात साजरा.
इंदापूर प्रतिनिधी: दिनांक २९ ऑगस्ट २०२२ रोजी राष्ट्रीय क्रिडा दिवस मेजर ध्यानचंद यांच्या जयंती निमित्त संपूर्ण भारतात साजरा केला जातो.
यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री निंबाळकर सर यांनी मैदानाचे पुजन करून आंतर विद्यालय कबड्डीची स्पर्धा घेण्यात आली
मुलांच्या दोन संघामध्ये ही स्पर्धा अतिशय चुरशिची व रोमहर्षक झाली असून सामन्यासाठी पंच म्हणून श्री पवार बी जी सर व श्री निंबाळकर एस एस सर व बाह्य पंच म्हणून श्री चव्हाण सर यांनी काम पाहिले.
गुणलेखक म्हणून श्री जगताप पी डी सर,शेंडे सर, सौ शेळके मॅडम व सौ जामदार मॅडम यांनी काम केले
क्रिडा शिक्षक श्री जामदार सर यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. तर शाळेचे मुख्याध्यापक श्री निंबाळकर सर स्वतः क्रिडा शिक्षक असल्याने सर्व जन खेळाने प्रेरित झाली.यावेळी त्यांनी सर्वांचे आभार मानले.

