shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कोपरगाव बेटात पहिल्या श्रावण सोमवार निमित्ताने जगातील एकमेव गुरू शुक्राचार्य महाराज मंदिरात करण्यात आली पूजा व आरती..!

कोपरगाव । प्रतिनिधी :कोपरगाव बेटात पहिल्या श्रावण सोमवार निमित्य जगातील एकमेव गुरू शुक्राचार्य महाराज मंदिरात पूजा व आरती करण्यात आली.माजी.नगराध्यक्ष मंगेश पाटील व सौ.प्रियालक्ष्मी पाटील यांचे हस्ते संपन्न.

          आपल्या हिंदू धर्मात अत्यंत पवित्र समजला जाणारा तसेच आपल्या हिंदू संस्कृतीत असलेल्या विविध धार्मिक उत्सवाची सुरुवात होते असा पावन " श्रावण " सुरू झाला आहे . त्या निमित्त गुरू शुक्राचार्य मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. श्रावण महिन्यातील पहिला सोमवार निमित्त केल्या जाणाऱ्या पुजे साठी कोपरगांव चे माजी नगराध्यक्ष व सकाळ समुहा तर्फे दिला जाणारा " आयडॉल महाराष्ट्र " या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले श्री व सौ मंगेश  पाटील  यांना आमंत्रित करण्यात आले होते .
त्यांच्या शुभ हस्ते पवित्र श्रावणी सोमवार च्या निमित्य महादेवाची , गुरु शुक्रचार्य महाराज व गंगा गोदावरी मातेची पूजा करण्यात आली. तसेच श्री व सौ पाटील यांचे हस्ते प्रसाद वाटप करण्यात आला.
यावेळी ट्रस्ट च्या वतीने श्री व सौ पतीला यांचा सत्कार करण्यात आला.

   या वेळी ट्रस्ट चे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड  , मंदिर प्रमुख सचिन परदेशी , सदस्य विशाल राऊत , विलास आव्हाड दिलीपराव सांगळे  .व्यवस्थापक राजाराम पावरा , पुजारी राजेंद्र कुलकर्णी , संजय जी रोडे , सौ संगीता कुलकर्णी व भक्त गण उपस्थित होते.  
या वेळी मंगेश पाटील यांनी ट्रस्ट चे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड व सर्वे सन्माननीय सदस्य यांचा  ते करीत असल्याच्या गुरू सेवेच्या , कार्यचा व मंदिर परिसर विकसित करून , जगातील एकमेव मंदिर जेथे संजीवनी मंत्राची महती आहे व जेथे कुठला ही मुहूर्त नसला तरी लग्न करता येतात असे हे महान स्थान, यांची माहती जगभर पसरवण्यासाठी व कोपरगाव चे नावलौकिक वाधवण्यासाठी करीत असलेल्या कामाबद्धल विशेष सत्कार केला. या वेळी पाटील यांनी त्यांना येणाऱ्या काळात बेटाचा रहात असलेला संपूर्ण परिसर / भाग व मंदिर परिसर विकसित करण्यसाठी  शक्य तेव्हडे सहकार्य करणार असे सांगितले , जेणेकरून देव दर्शनासाठी लोक येतील पर्यटन वाढेल व याचा उपयोग ही कोपरगाव ची बाजारपेठ वाढीसाठी ही उपयोग होईल .
close