shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रायवाडी ता.चाकूर येथील दिव्यांग विद्यार्थी सोहम माधव कराड इयत्ता तिसरी यांची राज्यपाल श्री भगतसिंग कोशारी यांनी घेतली भेट..!

संजय माकणे -(तालुका प्रतिनिधी चाकूर)

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रायवाडी येथे शिकत असलेला सोहम माधव कराड हा दीव्यांग असल्यामुळे त्याच्या शिक्षणात अडथळे येत असल्याने त्यांना लातूर येथील उमंग इन्स्टिट्यूट येथे ठेवण्याचा सल्ला मुख्याध्यापक श्री रणजीत घुमे व शाळेतील शिक्षकांनी दिला.

त्यामुळे पालकांचे मनपरिवर्तन करुन मुलास लातूर येथे ठेवले व तेथील शिक्षकां नी योग्य पद्धतीने त्याची हाताळणी केल्यामुळे तो सध्या शैक्षणिक प्रगती करत असल्याचे दिसून येत आहे.आज राज्यपाल लातूर दौऱ्यावर असताना भगतसिंग कोशारी यांनी सोहम माधव कराड यांच्याशी बातचीत केली. एका दिव्यांग असलेल्या पालकांना शाळेतील शिक्षकांनी योग्य सल्ला दिल्याने दिव्यांग बालकही शैक्षणिक प्रवाहात आल्याचे समाधान लाभल्याने ग्रामस्थही शिक्षकांचे खूप कौतुक करत आहेत.
close