shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्री नागेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज शेटफळगढे विद्यालयात स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन.

 श्री नागेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज शेटफळगढे विद्यालयात स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन.
इंदापूर-भिगवण: दि १६
   रयत शिक्षण संस्थेचे श्री नागेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज शेटफळगढे विद्यालयात स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
                 विद्यालयाचे ध्वजारोहण प्राचार्य बी आर भिसे यांनी केले. यावेळी स्कूल कमिटीचे सदस्य मानसिंग वाबळे, अनिल वाबळे, सरपंच शीतल धुमाळ,उपसरपंच अंबादास भोसले, बाळासाहेब भोसले ,पर्यवेक्षिका रोहिणी कुबेर,ग्रामपंचायतीचे सर्व सद्स्य, विद्यालयाच्या सल्लागार समितीचे सदस्य यावेळी उपस्थित होते.
यावेळी विद्यालयात,निबंधस्पर्धा,वक्तृत्वस्पर्धा,चित्रकलास्पर्धा, रांगोळी स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा घेण्यात आल्या. तसेच विद्यार्थ्यांकरिता बसविण्यात आलेल्या वॉटर फिल्टरचे उद्घाटनही करण्यात आले. तर स्वच्छ,सुंदर व शिस्तप्रिय वर्ग म्हणून वर्गशिक्षक संदीप जोशी व वर्गप्रतिनिधी स्वराज सूर्यवंशी यांचा सन्मान करण्यात आला.
         गुणवंत व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप विद्यालयाचे शिक्षक नामदेव दराडे यांनी केले.
        लेझीम पथक, झांजपथक व ढोल ताशांच्या गजरात प्रभातफेरी काढण्यात आली. वंदे मातरम् व भारत माता की जय या घोषणांनी परिसर दुमदुमुन गेला.
     यावेळी विद्यार्थ्यांची भाषणे झाली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक तात्यासाहेब गाडेकर यांनी केले.प्राचार्य बी आर भिसे यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.क्रीडासंचालक शहाजी वाघमारे यांनी  विद्यार्थ्यांचे कवायत संचलन व कार्यक्रमाचे संयोजन केले.
फोटो ओळ- रयत शिक्षण संस्थेचे श्री नागेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त वेशभूषा स्पर्धा घेण्यात आल्या.
close