प्रतिनिधी :आसावरी वायकर
नगर : १७ / ७ ऑगस्ट २०२२ रोजी झालेल्या तायक्वांदो स्पोट्स असोसिएशन अहमदनगर
तर्फे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेमध्ये सब ज्युनियर गटामध्ये कू. तेजस्विनी गिरीश हिरडे हिला गोल्ड मेडल कु. मिळाले .
तसेच १६ ऑगस्ट २०२२ रोजी अहमदनगर अर्बन ॲण्ड करल कराटे - डो असोसिएशन, अ. नगर तर्फे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कराटे स्पर्धा सब ज्युनिअर गटामध्ये सिल्व्हर मेडल मिळाले.
तेजस्विनी ही न्यू लॉ कॉलेज अहमदनगर येथील श्री .गिरिष हिरडे सर यांची मुलगी असुन तिला विविध स्पर्धेसाठी हिरडे सर नेहमीच प्रोत्साहन देतात .
तेजस्विनीची पदकांची घोडदौड सुरुच आहे . भविष्यात नॅशनल मध्ये गोल्ड मेडल चे स्वप्न पहाणाऱ्या तेजस्विनीच्या या सुवर्णवाटचालीमध्ये कराटे मास्टर सौ. मंदा खंदारे यांचा मोलाचा वाटा आहे. परिसरातील सर्व नागरिकांकडून तेजस्विनी वर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे .

