shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

केज येथे शुक्रवारी सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेचे आयोजन..!!

     

प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधि:
केजचे सुपुत्र स्मृतिशेष लोकनेते विनायकराव मेटे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी  शोकसभेचे आयोजन  शुक्रवार दि 19 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता केज पंचायत समिती सभागृहात करण्यात आले असून सर्व पक्षीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्व सामाजिक संस्था तसेच सर्व नागरिकांनी या शोकसभेत सहभागी व्हावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.


लोकनेते विनायकराव मेटे हे केज तालुक्याचे सुपुत्र व महाराष्ट्राचे नेते होते. त्यांनी बहुजन समाजाला न्याय देण्यासाठी प्रखर संघर्ष केला. अशा या नेत्यांचे केज तालुक्यातील प्रत्येकाशी व्यक्तिगत संबंध होते. 

यानिमित्ताने त्यांच्या आठवणी व त्यांच्याप्रती भावना व्यक्त करण्यासाठी या श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे. शोकसभेचा कार्यक्रम वेळेवर सुरू होईल तरी सर्वांनी वेळेवर उपस्थित राहावे असे कळविण्यात आले आहे.
close