shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

उड्डाणपुलाची उंची वाढवण्यात यावी याकरिताशेळगाव फाटा येथे सर्वपक्षीय शेतकऱ्यांनी केला रास्ता रोको आंदोलन.

उड्डाणपुलाची उंची वाढवण्यात यावी याकरिता
शेळगाव फाटा येथे सर्वपक्षीय शेतकऱ्यांनी केला  रास्ता रोको आंदोलन.

शेळगाव फाटा येथे जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावरील काम चालू असलेल्या उड्डाण पुलाची उंची वाढवण्यात यावी म्हणून रस्ता रोको करून  दिले निवेदन.

इंदापूर प्रतिनिधी: दिनांक १७ ऑगस्ट २०२२ रोजी इंदापूर तालुक्यातील शेळगाव फाटा येथे जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावर उड्डाणपुलाचे काम चालू आहे. सदर उड्डाणपुलाची उंची वाढवण्यात यावी याकरिता पंचक्रोशीतील सर्वपक्षीय शेतकऱ्यांनी इंदापूर बारामती रोडवरील शेळगाव फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करून प्रशासनाला उड्डाणपुलाचे होत असलेले काम त्वरित थांबून त्यामध्ये दुरुस्ती करावी या मागणी करिता आंदोलन केले. 
यावेळी भारतीय किसान मोर्चाचे पश्चिम महाराष्ट्राचे प्रमुख माऊली  चवरे, निरा भीमा सहकारी कारखान्याचे चेअरमन लालासाहेब पवार, भाजपा अध्यात्मिक आघाडीचे प्रदेश पदाधिकारी बाबा  खारतोडे ,भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सचिव आकाश कांबळे, ॲड. नितीन कदम, संतोष कांबळे सचिव भाजपा अनुसूचित जाती मोर्चा महाराष्ट्र राज्यात तथा प्रभारी बारामती लोकसभा मतदारसंघ, शिरसाटवाडी चे सरपंच नाना रावण, संतोष ननवरे पोलीस पाटील भागवतराव भुजबळ ,अंकुश धापटे, संतोष भांगे, ॲड बापूसाहेब साबळे,  मोहन दुधाळ आणि शेळगाव पंचक्रोशीतील नागरिक युवा कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने रास्ता रोको आंदोलनामध्ये सहभागी झाले होते.
 यावेळी इंदापूर तहसील ऑफिसचे नायब तहसीलदार ठोंबरे , वालचंदनगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लातूरे, तलाठी सर्कल भाऊसाहेब रोडचे अधिकारी हे निवेदन घेताना उपस्थित होते.
 रास्ता रोको आंदोलनाच्या अगोदर सकाळी ठीक अकरा वाजता सामूहिक राष्ट्रगीत घेण्यात आले.
close