shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्रीमती हिराबाई हरिभाऊ देसाई विद्यालय बेलवाडी मध्ये स्वतंत्र दिन मोठ्या उत्साहात साजरा.

श्रीमती हिराबाई हरिभाऊ देसाई विद्यालय बेलवाडी मध्ये स्वतंत्र दिन मोठ्या उत्साहात साजरा.
इंदापूर प्रतिनिधी: श्रीमती हिराबाई हरिभाऊ देसाई विद्यालय मध्ये स्वतंत्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .अर्जुन देसाई यांचे चिरंजीव दिपक अर्जुन देसाई यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

 या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून छत्रपति साखर कारखान्याचे माजी व्हा.चेअरमन कांतीलाल आप्पा जामदार व अध्यक्ष म्हणून कारखान्याचे संचालक मा सर्जेराव  जामदार उपस्थित होते तसेच बेलवाडी गावचे सरपंच  माणिक  जामदार व त्यांचे सर्व सदस्य व गावातील अनेक प्रतिष्ठित लोक उपस्थित होते. 
 इयत्ता ६वी,७वीआणि १०वी विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केली.त्यांना शेळके मॅडम, जामदार मॅडम, दत्तात्रय राऊत, व प्रणव पवार यांनी साथ दिली.इयत्ता ९वीच्या विद्यार्थ्यांनी संचलन केले त्यांना मार्गदर्शन जामदार सर यांनी केले .लेझिम ७वी, ८वी,१०वीच्या मुलांनी सादर केले त्यांना चव्हाण सरांनी मार्गदर्शन केले , साहित्य कवायत ५वीच्या मुलांनी सादर केले त्यांना पवार सर काटकर सर निंबाळकर सर यांनी मार्गदर्शन केले
close