श्रीनाथ विद्यालयामध्ये भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवीवर्षाचे ध्वजारोहण उत्साहात साजरे.
इंदापूर प्रतिनिधी:सोमवार दिनांक १५ ऑगस्ट २०२२ रोजी श्रीनाथ विद्यालय वडापुरी या ठिकाणी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे ध्वजारोहण श्रीनाथ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष पोपट बागल यांच्या हस्ते अत्यंत उत्साहात करण्यात आले.
याप्रसंगी श्रीनाथ शिक्षण प्रसारक मंडळचे संचालक अरुण फडतरे, निवृत्ती शिर्के, नवनाथ बागल उपस्थित होते. त्याचप्रमाणे प्राथमिक व माध्यमिक शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्य सेवानिवृत्त कर्मचारी, माता पालक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
याप्रसंगी संचलनाच्या माध्यमातून माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रध्वजास मानवंदना दिली तसेच विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात आली. विद्यालयातील एस एस सी परीक्षा मार्च २०२२ मधील प्रथम तीन क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले .कार्यक्रमाचे आयोजन विद्यालयाचे मुख्याध्यापक शहाजी तपासे तसेच सह शिक्षक भारत पासगे ,हनुमंत खताळ, सहशिक्षिका सौ शकुंतला पवार, सौ सीमा थोरात, शिक्षकेतर कर्मचारी प्रल्हाद शिर्के, समीर मदने यांनी केले .
कार्यक्रमाचे प्रस्ताविक व सूत्रसंचालन विद्यालयाच्या सहशिक्षिका सौ अर्चना शिर्के यांनी केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांना गणवेश वाटप व खाऊ वाटप करण्यात आले.

