shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

एन. ई. एस. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय निमसाखर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव विविध उपक्रमासह उत्साहात साजरा.

एन. ई. एस. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय निमसाखर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव विविध उपक्रमासह उत्साहात साजरा.

आ. यशवंत माने यांनी विद्यार्थ्यांसाठी बॅच करिता १ लाख ११ हजार रुपये देणगी     केली जाहीर .

गरीब गरजू  विद्यार्थ्यांसाठी ३० सायकलचे वाटप.
इंदापूर प्रतिनिधी:निमसाखर एज्युकेशन सोसायटी संचलित एन. ई. एस. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय निमसाखर तालुका इंदापूर जिल्हा पुणे या ठिकाणी ७५ वा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला.  कार्यक्रमाचे ध्वजारोहण जीवन शिक्षण विद्यामंदिर प्राथमिक शाळा निमसाखरचे माजी मुख्याध्यापक व ज्येष्ठ नागरिक जाफर सुलेमान शेख यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी मोहोळचे विद्यमान आमदार यशवंत विठ्ठल माने हे होते तसेच संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कुमार सूर्यकांतराव रणवरे, उपाध्यक्ष संजयकुमार सूर्यकांत रणवरे, सचिव धनंजय रणवरे व विविध कार्यकारी विकास सेवा सोसायटीचे चेअरमन नंदकुमार सूर्यकांतराव रणवरे, सरपंच धैर्यशील विजयसिंह रणवरे, पोलीस पाटील सौ. मोनिका अभिजीत रणवरे तसेच गावातील माजी सैनिक, ग्रामस्थ, पालक, माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 यावेळी आमदार यशवंत माने यांनी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी बॅच  करिता १ लाख ११ हजार रुपये देणगी जाहीर केली.  त्यांनी सर्वांना
 स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त शुभेच्छा दिल्या. आपल्या विद्यालयाची उत्तरोत्तर प्रगती व्हावी असे मत व्यक्त केले .

यावेळी संस्था सचिव यांनी स्वातंत्र्य दिनाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक कौतुक केले.
 भगवान विष्णू रणसिंग यांनी त्यांच्या ७५ व्या वाढदिवसा निमित्त विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांसाठी ७५०० रुपये देणगी दिली व बाळासाहेब आनंदराव रणवरे यांनी इयत्ता दहावी व बारावी बोर्डातील अनुक्रमे प्रथम ३ क्रमांकांना एक पुस्तक संच व अडुळसाचे रोप बक्षीस म्हणून दिले.
 निरा कॅनल बारामती तर्फे २५ रोपे कुंडीसह विकास कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन नंदकुमार रणवरे यांच्याकडून देण्यात आले व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे तर्फे ७५ वृक्षांची स्वखर्चाने लागवड करण्यात आली.

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक शूर वीरांनी बलिदान दिले व हे स्वातंत्र्य खूप कष्टातून मिळवले असे मत संस्था अध्यक्ष राजेंद्रकुमार सूर्यकांतराव रणवरे यांनी व्यक्त केले. संस्थापक अध्यक्ष कै. सूर्यकांतराव मारुतराव रणवरे यांनी लावलेल्या छोट्याशा वृक्षाचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे असे मत प्राचार्य चंद्रकांत गोपाळराव रणवरे यांनी व्यक्त केले.
तसेच सकाळ सोशल फाउंडेशन व इंद्रायणी बलन फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ३० सायकल विद्यालयातील गरीब हुशार निराधार गरजू विद्यार्थ्यांना देण्यात आल्या. यासाठी राजकुमार थोरात  यांचे सहकार्य लाभले.
यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर समूह गीत त देशभक्तीपर नृत्य व तांडव नृत्य सादर केले.
या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहिलेल्या माजी सैनिकांचा गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री हनुमंते सर यांनी केले तर सूत्रसंचालन आजिनाथ मालगुडे यांनी केले.
close