shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अखिल भारतीय वडार बोली साहित्य संमेलन -२०२२ दुसरे पूर्व तयारी आढावा बैठक पुण्यात संपन्न ..!


पुणे -  अखिल वडार बोली साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य, पुणे आयोजित अखिल भारतीय वडार बोली साहित्य संमेलन -२०२२ दुसरे पूर्व तयारी आढावा बैठक जेष्ठ विचारवंत व साहित्यिक मा. श्री. टी. एस. चव्हाण, औरंगाबाद यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

      यंदाचे दिवाळीचे सुट्टीत रविवार दिनांक ३० आकटोंबर २०२२ रोजी सकाळी ९.०० वा. ते संध्याकाळी ८.०० वा. साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक कला रंग मंदिर, येरवडा, पुणे - ६ येथे आयोजित करण्यात येणार आहे.


         ग्रंथदिंडी ही आदल्या दिवशी करण्यात येणार असून जे पुरस्कार प्रदान जातील ते आपल्या समाजातील ऐतिहासिक क्रांतीकारक, साहित्यिक नावाने दिले जाणार आहेत. त्याबाबत विविध प्रसार माध्यमात पोस्ट केले जावे असे मत मांडले, अंतिम रूप देण्यासाठी पुढील बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे. वैभवशाली वडार समाज गौरव अंक छपाई करण्यात यावी, जेणेकरून वर्तमान आणि भविष्य काळात समाजाला मार्गदर्शक ठरणार आहे.  त्याला समाजाकडून भरभरून प्रतिसाद मिळेल, अशी आशा आहे.


         आगामी साहित्य संमेलनास महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटक, दिल्ली इ‌. अशा विविध राज्यातील अनेक साहित्यिक सहभागी होणार आहेत‌.

        सदर संमेलन अध्यक्ष  साहित्यिक व नावाजलेला तो महाराष्ट्र बाहेरील देखील नाव असेल तसेच निमंत्रित  व प्रमुख पाहुणे नावे पुढील बैठकीत नावे निश्चित करण्यात येणार आहेत. संमेलन उदघाटन हे एखाद्या मंत्री महोदय यांचे शुभहस्ते करण्यात येणार आहे.महिला संयोजन समिती गठित करण्यात येणार असून त्यामध्ये अँड. कु. अश्विनीताई नलावडे, पुणे सौ. निर्मलाताई कुर्हाडे, तळेगाव दाभाडे, पुणे यांचा समावेश करण्याचे ठरविण्यात आले.पुढील पूर्व तयारी आढावा बैठक धुळे येथे पुढील महिन्यात आयोजित करण्यात येणार असून पुढील काही निर्णय त्या बैठकीत घेतले जाणार आहेत.

        या बैठकीत मा. सौ. सुवर्णताई शिंदे- चौगुले, तुरुंगाधिकारी, अहमदनगर यांचे तर्फे गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना वह्या पुस्तके, बॅग शालेयपयोगी वस्तू वाटप करण्यात आले.तसेच या कार्यक्रमात मा श्री राकेश विटकर साहेब वडार समाज संघटना महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष यांनी त्यांचे संघटनेचे वतीने आगामी साहित्य संमेलनास रक्कम रु. ५० हजार रुपये मदत जाहीर केले आहे व उद्योजक मा. राजाराम विटकर, पुणे यांनी दुसरे बैठकीचे स्नेह भोजनाचा खर्च केले.

             या बैठकीस सर्वश्री राकेश विटकर पुणे, राजाराम विटकर पुणे, अड अश्विनीताई नलावडे पुणे, सौ. निर्मलाताई कुऱ्हाडे, तळेगाव दाभाडे, मनोहर मुधोळकर सोलापूर, अशोक पवार पुणे, रमेश जेठे देहरे अहमदनगर, हरिष बंडीवडार पुणे, शांताराम मनवरे पुणे, अशोक इटकर पुणे, भिमाण्णा झडपे पुणे इत्यादी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
          या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि समारोप श्री शांताराम मनवरे यांनी केले.

close