shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

न्याहळोद येथे ध्वजारोहण कार्यक्रम...! .

न्याहळोद : येथील महात्मा ज्योतिबा फुले शिक्षण  मंडळाचे नूतन विद्यालय येथे ध्वजारोहण कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न.                        .                                                      
सकाळी विद्यार्थी व विद्यार्थिनींनी गावातून भव्य रॅली काढून घोषणा देत ग्रामपंचायतीवर ध्वजारोहण करून आपापल्या शाळेत ध्वजारोहण कार्यक्रमासाठी विद्यार्थी व शिक्षक मार्गस्थ झाले, नूतन विद्यालय शाळेच्या पटांगणात ध्वजारोहण कार्यक्रम झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी उपसरपंच देविदास जिरे हे होते. स्वातंत्र्य अमृत महोत्सव ध्वजारोहण कार्यक्रम संस्थेचे अध्यक्ष दिलीपभाऊ उपाध्ये यांच्या हस्ते करण्यात आला. हुतात्म्यांना श्रद्धांजली सुमित घरटे यांनी दिली,

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक मंडळाचे शिक्षक एस के शिरसाठ यांनी केले तर आभार प्रदर्शन राकेश कोळी यांनी मानले.यावेळी ध्वजगीत गाऊन राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली, अमृत महोत्सवाचे औचित्य साधून संस्थेचे अध्यक्ष आदरणीय दिलीप भाऊ उपाध्ये यांच्या वतीने विद्यार्थी शिक्षक व ग्रामस्थांना जिलेबी वाटप करण्यात आली. प्रसंगी जिल्हा परिषद रिटायर स्टेनो विजय रायते, संस्थेचे उपाध्यक्ष भास्कर माळी, माजी सरपंच दिलीप भोगे, विजूआप्पा पाटील, राजाराम सैंदाणे, चांदखा पठाण, अमृतआबा पवार, महारुदाजी पवार(भील), आबा माळी, कैलास पाटील, राजू काकूडदे, भाऊसाहेब माळी,नामदेव रोकडे, जीवन जिरे,आबा शिंपी, सुनील पुराणिक, राजू भावसार, सुरेश रायते, छोटू पाटील (चक्की वाले), चंद्रशेखर पाटील,  मोहन कोळी, सुभाष कोळी , भारत सैंदाणे,पंकज कोळी, दिनेश कोळी, सरदार कोळी, कौतिक कोळी, अमृत कोळी, नारायण सोनवणे, धनराज सोनवणे, कैलास कोळी, राजू पवार (भील), राहुल कोळी, बबलू धोबी भाईदास कोळी, बंटी कोळी, सुधाकर जाधव, गणेश कोळी,ग्रामपंचायत सदस्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व पालक वर्ग आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
close