shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आय ए एस अधिकारी असताना ही जमीनीवरच पाय ठेवून असणारे जिल्हाधिकारी बालाजी मंजूळे समाजाला एक आदर्शवत..!

शिर्डी एक्सप्रेस लाईव्ह नेटवर्क
सिद्धटेक ।  बालाजी मंजूळे हे मुळ सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील जेऊरचे. आज ते आंध्र प्रदेशात जिल्हाधिकारी आहेत. सिद्धटेक येथे त्यांचे कुलदैवत आहे. त्या ठिकाणी कुलदैवतेचे भिमा नदीच्या तीरावर असलेल्या गंगापुजन निमित्ताने त्यांची उपस्थिती होती.आय ए एस जिल्हाधिकारी असताना ही त्यांच्या मनात अधिकारी असल्याचा कुठलाही लवलेश कार्यक्रमात दिसून आला नाही. इतर वेळी संरक्षणाच्या गराड्यात असणारा अधिकारी यावेळी अगदी सामान्य माणसाप्रमाणे दिसून आले.


कुलदैवतांचे गंगाापूजन करताना जिल्हाधिकारी बालाजी मंजूळे साहेब

यावेळी कुलदैवत मंदिर ते भिमानदी किमान तीन किलोमीटर होते. यावेळी एरव्ही सरकारी वाहनातून प्रवास करणारे बालाजी मंजूळे साहेब यांनी वाजत गाजत चाललेल्या जनसामान्यांबरोबर जाणे येणे धरुन सहा किलोमीटर पर्यंत पायी चालले हे विशेष..!

वडार समाज संघ,प.म.अध्यक्ष रामचंद्र मंंजूळे, जिल्हाधिकारी बालाजी मंजूळे साहेब, त्यांचे वडील दिगंबर मंजूळे, शिल्पकार रमेश मंजूळे आदी.


शिर्डी एक्सप्रेस संपादक रमेश जेठे(सर) जिल्हाधिकारी बालाजी मंजूळे साहेब, त्यांचे वडील दिगंबर मंजूळे

बालाजी मंजूळे यांनी अतिशय गरिब परिस्थितीतून उच्च शिक्षण घेऊन आय ए एस अधिकारी झाले. आई- वडीलांनी दगड खाणी वर दगड-खडी फोडून त्यांना मोठ्या जिद्दीने उच्च शिक्षण दिले. म्हणून त्यांना " दगड खाणीतला हिरा" "चमकता तारा" असे संबोधले गेले आहे.

त्यांची आई खुप धाडशी होती. खडी फोडताना अनेक अधिकारी खडी कमी साईजमध्ये फोडली नाही. पुन्हा खडी फोडावी लागेल. किंवा अनेक वेळा गरिबीची थट्टा करत त्यांना अधिकारी पेमेंट देण्यासाठी टाळाटाळ करत असत.यासाठीच या माय माऊलीने आपल्याच मुलांना जिल्ह्यातील सर्वात ‌मोठा अधिकारी बनवण्याचा निश्चय केला. रात्रंदिवस काबाडकष्ट करून, वेळप्रसंगी स्वतः उपाशी पोटी राहुन बालाजी यांना शिक्षणासाठी काही कमी पडू दिले नाही. या गावावरून त्या गावात भटकंती करत काबाडकष्ट करून आपल्या मुलाला आय ए एस अधिकारी बनविण्याचे स्वप्न उराशी बाळगून त्या पध्दतीने शिक्षण दिले.

बालाजीं यांनी देखील आई.वडीलांच्या कष्टाला दादा देत रात्रंददिवस राॅकेलच्या दिव्याच्या उजेडात अभ्यास केला, परिक्षेच्या अगोदर तीन वर्षे दररोज सलगपणे दोनशे प्रश्नांचा अभ्यास केला. अनेक विचारवंतांची पुस्तके वाचून काढली. वाचच्याकामी ते कधीच थांबले नाहीत.घटनेचे पुस्तकही अनेक वेळा वाचून काढले.असे करता करता परिक्षा दिली आय.ए.एस.अधिकारी बनले. महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला. सगळीकडे त्यांचा लक्षवेधी आधार सत्कार करण्यात आले. आईची इच्छा पुर्ण झाली. आई वडिलांनी भरभरून बालाजीं ना आशीर्वाद दिला. अशा या जिल्ह्याधिकारी यांनी कुलदैवतेचे गंगापूजन कार्यक्रमास उपस्थित राहिले. ही बाब मंजूळे परिवारासाठी व समाजासाठी खूप आनंददायी आहे. 

या कार्यक्रमाचे आयोजन रमेश मंजूळे, शिवाजी मंजूळे,राम मंजूळे, छगन मंजूळे, वडार समाजाचे प.म.अध्यक्ष रामचंद्र मंजूळे  यांनी केले. मंजूळे परिवारातील अनेक सदस्य गंगापूजन कार्यक्रमास आवर्जून उपस्थित होते.
close