shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

‘नाद’ वाद्यपथकाचा नामांतर सोहळा उत्साहात संपन्न ; महाराष्ट्राची संस्कृती जपण्याचे काम वाद्यपथके  करीत आहेत -  आ.संग्राम जगताप

प्रतिनिधी : आसावरी वायकर

  नगर : २४ /    काही वर्षापूर्वी पुणे, मुंबई सारख्या शहरातून तरुणांनी ढोल पथकाचा आदर्श घेवून नगर शहरातही ढोल ताशा पथक सुरु केले. याच ढोल पथकातून कालांतराने अनेक ढोल-ताशा पथके निर्माण झाली. त्याचबरोबर कै. कैलासमामा गिरवले यांच्या संकल्पनेतून श्री कपिलेश्वर मित्र मंडळाच्या माध्यामातून सात वर्षांपूर्वी शहरातील पहिले सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे ढोल-ताशा पथक उभे राहिले. आज या वाद्यपथकाचा नामांतर सोहळा पार पडत आहे. महाराष्ट्राची संस्कृती जपण्याचे काम ही वाद्यपथके करीत आहे. त्यामुळे तरुणांनी या कार्यात मोठ्या संख्येने सहभागी होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले.

     ‘नाद’ वाद्यपथकाचा नामांतर सोहळा आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी नाथकृपा लॉनचे भुषण गारुडकर, सागर मुर्तडकर, ओंकार घोलप, पथक प्रमुख गिरीश रासकर, सागर आहेर, केतन खरपुडे, महेश दिक्षित,  संदेश लोखंडे, कृष्णा बुलाखे, आकाश सोहत्रे, करण आहेर, प्रतिक नारद, सुरज वाघमोडे, सौरभ आहेर, रितेश तांबे, अदित्य दिक्षित, रोहित वाघमारे, अक्षय खंडेराव, गणेश मोकाटे, करण नाटेकर, सिद्धार्थ रासकर, सुनिता टेके, शुभांगी केदारी, आदेश पवार, अपूर्वा पांडुळे, समृध्दी सराफ, गौरी मोकाटे, अपेक्षा खंडागळे, वैष्णवी सरोदे, मयुरी बोर्‍हाडे, भक्ती जाधव, गायत्री गुरप, हर्षदा आहेर यांसह पथकातील सदस्य व पालक वर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

     पुढे आ.जगताप म्हणाले की, गणेशोत्सवाचा काळ जसाजसा जवळ येतो तसा शहरातील अनेक भागातून ढोल ताशा पथकांच्या सरावांचा आवाज संपूर्ण शहरात घूमू लागतो. या वाद्यपथकांत शालेय विद्यार्थ्यांपासून नोकरी, व्यवसाय संभाळणारे अनेक तरुण सहभागी होत असतात. गणेशोत्सवाच्या एक महिना अगोदर ढोल पथकांच्या सराव सुरु होतो. खरेतर ढोल, ताशा वाजवणे सोपे नसून यासाठी अथक परिश्रम घ्यावे लागतात. याचा सारखा सराव करावा लागतो. सरावादरम्यान या वाद्यपथकांना अनेक गोष्टींना सामोरे जावे लागते. परंतू या सर्व अडचणीतून मार्ग काढून सर्व मंडळी आपला ‘नाद’ पूर्ण करीत आहेत.

     यावेळी उपस्थित मान्यवरांचे मनोगत झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गिरीश रासकर यांनी केले. सुत्रसंचालन महेश दिक्षित यांनी तर आभार सागर आहेर यांनी मानले.

     कार्यक्रमानंतर नाद वाद्यपथकाव्दारे वादन सुरु झाल्यानंतर आ. संग्राम जगताप यांनीही वादनात सहभागी होवून भगवा ध्वज हाती घेवून ध्वज नाचवू लागले.
close