shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अखिल भारतीय मेहतर समाज संघटनेच्या वतीने पोलिसांचा सत्कार

प्रतिनिधी : निरज चांगटे

नगर :२४ /  भिंगार शहरात भगवान श्री.जाहरविर गोगादेव जन्मोत्सव(बागड) मिरवणूक मोठ्या उत्साहात संपन्न झाली . भिंगार शहर येथे पोलिस प्रशासनाने कडक बंदोबस्त दिल्यामुळे मिरवणूकीत वाहन चोरी,महिला छेडछाड,दागीने चोरी असे कोणतेही अनूचित प्रकार घडले नाहीत . पोलिस प्रशासनाचे चांगल्या प्रकारचे  नियोजन असल्याने मिरवणूक शांततेने यशस्वी पार पडली .

 अखिल भारतीय मेहतर समाज संघटनेचे जिल्हाअध्यक्ष सनिभैय्या खरारे यांच्या मार्गदर्शनाखाली भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक मा.देशमुख साहेब यांचे श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून कौतुक करण्यात आले.

या प्रसंगी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सनिभैय्या खरारे,जिल्हा उपाध्यक्ष राहुल लखन,जिल्हा सचिव दिपक नकवाल,विक्रम चोहान (सर), कुणाल बैद,सल्लागार प्रशांत पाटोळे(पत्रकार),कार्याध्यक्ष शुभम टाक,सामाजिक कार्यकर्ते संजय भाई झांझोट,अरुण मेवाती, अभिषेक भगवाने,शैलेश घावरी,तेजस भगवाने,राजेश मटू, आनंद बंगन्न,अजय नरवाला आदी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
close