सुरवड येथे हर्षवर्धन पाटील यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमातून साजरा.
अंगणवाडी तील मुलांना श्री दत्ताञय घोगरे सर, श्री प्रकाश घोगरे सर व श्री दशरथ घोगरे सर यांच्या वतीने शैक्षणिक साहित्याची वाटप
इंदापूर प्रतिनिधी:राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक उपक्रमातून काय अंगणवाडी तील मुलांना श्री दत्ताञय घोगरे सर, श्री प्रकाश घोगरे सर व श्री दशरथ घोगरे सर यांच्या वतीने शैक्षणिक साहित्याची वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी सुरवड गावच्या सरपंच सौ.योगिता शिंदे, मा.पंचायत समिती सदस्य श्री सुरेश मेहेर ,निरा भीमा कारखान्याचे संचालक दादासाहेब घोगरे ,श्री रामदास दादा कोरटकर, श्री शिवाजी कोरटकर, श्री नजीर मोमीन, अंगणवाडी सेविका सौ माने मॅडम ,सौ कांबळे मॅडम,सौ मोरे मॅडम ,सौ मोमीन मॅडम तसेच जि.प,शाळा मुख्याध्यापक श्री दत्ताञय तोरसकर हनुमान विद्यालयाचे मुख्याध्यापक कोकाटे सर तसेच दत्ताञय घोगरे सर,श्री प्रकाश घोगरे सर शिवाजी विद्यालयाचे प्राचार्य दशरथ घोगरे सर उपस्थित होते.

