आज आपला मित्र साईभक्त श्री.प्रकाश कोल्हे,शिर्डी सेवानिृवत्त होत आहे.1991 ते आज 1922 म्हणजे 32 वर्षाची साईसेवा करत सेवानिृवत्ती झाली.
प्रकाशच्या बाबतीत असे वाटते.
काही माणस अशी असतात
रसत्याकडे डोळे लावुन बसतात
काही माणस अशी असतात
दारातच स्वागत करतात
पन काही माणसं मात्र अशी असतात
कायमचीच काळजात घर करुन बसतात...
असा मित्र कधीही शिर्डीला जा आणी प्रकाशला फोन करा आज साईबाबाचे दर्शन घ्यायचे लगेच कोणतेही कारण न सांगता मित्र सेवेला हजर असा श्रध्दा आणी सबुरीचे तंतोतंत पालन करणारा दिलदार मित्र.
असो असे जग रहाटी प्रमाणे चालावे लागते थांबुन चालत नाही
भविष्यात आपणास काही गरज भासलीस तर आमच्या दारावर केंव्हाही थाप मारा तो दरवाजा आपणासाठी सदैव उघडा असेल.आणी आम्हास काही अडचण आलीस तर आम्ही तुम्हांला साद घातली तर त्यास प्रतिसाद द्या! तुम्ही आमच्या हाकेला ओ देणारच आहात आम्हाला खात्री आहे.यासाठी आपणास उदंड आयुष्य लाभो याच आमच्या सदिच्छा!आपणा विषयी शेवटी एव्हडेच म्हणाविसे वाटते की.,,
माया, ममता संस्कार सारे,
शाश्वत चेत कामा येईल!
आपले संस्कार आपले ज्ञान,
कसे बरे वाया जाईल!
मित्रा प्रकाश तु सेवानिवृत्त झाला असे मी कधीच म्हणणार नाही,त्याच्या बाबतीत मी एव्हडच सतत म्हणत राहिल...
वयोमान जरी झाले,
वयात काय आहे?
अधिक फुलण्याचेही
वय अजुन आहे!
आपणास उदंड आयुष्य आरोग्यदाई लाभो हिच साईचरणी प्रार्थना..!
- पत्रकार संजय महाजन.

