श्री.गणेश ..
आगतम् सुस्वागतम्
आले आले गणपति
क्षण क्षण भारावलेले
जोवर राही अधिपती
उत्सवी उन्माद नको
जागवू छान संस्कृती
उत्साही प्रमाद नको
अशीचं बनवूआकृती
खास छान घडवली
पर्यावरण पुरक मुर्ती
संरक्षित बनतो वृत्ती
निरागस राहे प्रकृती
कलागुणांचा देव तो
मिळत रहावी स्फुर्ती
माझ्याआधी दुजा दे
नित्य हो वचन पूर्ती
संकटे येवो कितीही
लाभो लढाया शक्ती
निरपेक्ष सेवा घडावी
हृदयी निर्मळ भक्ती
सकल संतु निरामय :
सर्वे भद्राणी पश्यंति
जीवन सार्थकी होई
मोक्ष लाभावा अंती
2
गणेशोत्सव ..
वाजू लागे ताशाढोल
सगळे धरतात ताल
माणूस उत्सव प्रेमी
वेगळेपण त्या बहाल
उत्सवीसामील होता
तुटे जात मायाजाल
समीकरण बदलेलं
जे चाले सालोसाल
एक संघी एक रंगी
सहज तुम्हीचं व्हालं
विसरूनि लहानथोर
सुख आनंदात न्हालं
शोभून दिसे उत्सवी
कुटी जवळ महाल
आगळी वेगळी असे
निधर्मीपणाची ढाल
माणसाच्या अंगावरी
उत्सवी रेशमी शाल
दुःखावर फुंकर घाले
जादुई जणूं कमाल
असे कुठल्या धर्माचा
सामील व्हावे खुशाल
उत्सव ओळख खरी
रहाल नीत खुशहाल
- हेमंत मुसरीफ पुणे.
9730306996
www.kavyakusum.com
3)
विघ्ननाशक ..
विघ्ने ये विघ्नामागे
विघ्न हरा विघ्नहरे
शिव सुता गौरीपुत्रा
तुझीचंआम्ही लेकरे
कोरोनाला घालवले
टळला यम फास रे
तरी शांती हरविलो
सदैव मृत्यू भास रे
महाभारत लिही तू
कथन करी व्यास रे
पुन्हा युध्दे चालली
पुरे बाआता बास रे
महोत्सव सोहळे ते
सगे सोयरे ही विसरे
अंतरात स्थापी तुझं
स्थान ना दुजे दुसरे
कोल्हेकुई असह्य ही
भ्याली तुझीचं वासरे
पिडले कधी दुष्काळे
त्रस्त व्यस्त महा पुरे
आधार समर्थ तुझा
संकटा करे -हास रे
दूर व्हावे मळभ सारे
लयीत चालो श्वास रे .
- हेमंत मुसरीफ पुणे.
9730306996..
www.kavyakusum.com

