शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे. गुरूवार दिनांक २५ ऑगस्ट २०२२
राहुरी : डाॅ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार अद्याप फरार ; मुख्य सूत्रधाराचा शोध घेऊन कठोर शिक्षा करावी...!!
राहुरी : डाॅ. नरेंद्र दाभोलकर खूण प्रकरणाला आज ९ वर्षे पूर्ण झाली. अद्याप या प्रकरणातील मुख्य सूत्रधार मोकाट आहे. डाॅ. दाभोलकर याच्या हत्ये प्रकरणातील मुख्य सूत्रधाराचा शोध घेऊन कठोर शिक्षा करावी. अशा विविध मागण्यासाठी दिनांक २४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र अंधश्रद्ध निर्मूलन समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले.
तहसीलदार फसिओद्दीन शेख यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा २० ऑगस्ट २०१३ रोजी पुण्यामध्ये काही धर्मांध शक्तींकडून निर्घृण खून करण्यात आला. या घटनेला आज ९ वर्षे पूर्ण होत आहेत. अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम डॉ. नरेंद्र दाभोलकर करायचे. म्हणूनच त्यांचा खून प्रतिगामी विचारांच्या संघटनेच्या मारेक-याकडून करण्यात आला हे आता स्पष्ट झाले आहे. परंतु डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या पश्चात ही त्यांच्या निर्भीड आणि विवेकी कार्यकर्त्यांनी त्यांचे कार्य पुढे जोमाने सुरू ठेवले आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनानंतर कॉ. गोविंद पानसरे, डॉ. कलबुर्गी, गौरी लंकेश या पुरोगामी विचारवंताचे ही खून केले गेले. या चारही खूनामागे एकच संघटना आहे, असे तपासातून पुढे येत आहे. नरेंद्र दाभोलकर यांच्या खूनाचा तपास सध्या सीबीआय करत आहे. या चारही खूनांबद्दल महाराष्ट्रातील जनतेच्या मनात तीव्र वेदना, खदखद आहे.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खूनामागच्या मुख्य सुत्रधाराचा शोध घ्यावा. या खूनामागच्या धर्मांध संघटनेवर कठोर कारवाई करण्यात यावी. हा खून खटला जलद गतीने चालवून मारेक-यांना कठोर शिक्षा करावी. आदि मागण्या महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने आपल्या व्दारे केंद्र व राज्य सरकारकडे करीत आहोत. त्या आपण त्वरित सरकारकडे पोहचवाव्यात. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि सर्व पुरोगामी संघटनांच्या वतीने या निवेदनास आम्ही पाठिंबा देण्यात आला आहे.
दिलेल्या निवेदनावर मधुकर अनाप, महेश धनवटे, संदिप कोकाटे, राहुल वायळ, मच्छिंद्र दुधवडे, कैलास बुळे, सुदाम सरोदे, सतिष डौले आदिंच्या सह्या आहेत.
Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

