shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्री दिगंबर जैन माणिकस्वामी महाराज मंदिराचे जिर्णोद्धार शुद्धी समारोह सोहळ्याचे आयोजन ...


प्रतिनिधी : आसावरी वायकर

सोलापूर : २५ / श्री दिगंबर जैन माणिकस्वामी महाराज मंदिर भुसार पेठ, सोलापूर येथे मंगल प्रेरणास्थान परमपूज्य आचार्यश्री शांतिसागरजी मुनिराज पूज्य भट्टारकश्री भट्टाकलक स्वामीजी सौंदा यांच्या सानिध्यात पवित्र स्थानी जीर्णोद्धारित जिनमंदिर शुद्धी समारोह श्री कलिकुंड पार्श्वनाथ विधान रविवार दि. २८ व सोमवार दि. २९ ऑगस्ट २०२२ रोजी होणार असुन याचे सर्व अनुयायी व भक्तगण यांनी लाभ घ्यावा असे कमिटी मार्फत सांगण्यात आले आहे .

 एका प्राचीन जिनमंदिराच्या जीर्णोद्धाराचे पुण्य शंभर नवीन जिनमंदिर बांधण्यापेक्षा अधिक असते.सोलापुरातील १७५ वर्ष प्राचीन श्री माणिकस्वामी दि. जैन मंदिरात भगवान पार्श्वनाथांची पंचधातूमय विशाल प्रतिमा तसेच भूगर्भातून प्राप्त झालेली भगवंताची अतिकारी प्रतिमा सहजच भक्तांचे ध्यान आकर्षित करते.
रत्नमयीं माणिकस्वामी मंदिर निर्माता हुमडदसा गांधी हेमचंद रामचंद परिवाराचे वंशज डॉ. रणजित हिराताल (भाऊसाहेब) गांधी व परिवारद्वारे मंदिराचे मूळ गर्भगृह वेदी मूर्ती इ. सुरक्षित ठेवून आद्योपांत जीर्णोद्वार पूर्ण झाला आहे. मंदिरात मार्बलचे सुंदर नक्षीकाम व बीजाक्षर अप्रतिम स्तंभाची निर्मिती झाली आहे. सुंदर महाद्वार सर्वांचे मन सहजच आकर्षित करीत आहे. या सर्व भव्य रचनेमुळे मूळ प्रतिमा अधिकच आकर्षित दिसत आहे. दीर्घकाळात अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने पूर्ण झालेल्या जीर्णोद्धारानंतर या मंदिराचा पुनर्लोकार्पण सोहळाही भव्यतेने करण्याच्या दृष्टीने दक्षिण भारतातील तेराशे वर्ष प्राचीन आचार्यश्री अकलंक स्वामींद्वारे स्थापित सौंदा कर्नाटक मठाचे पूज्य भट्टारकत्री भट्टाकलंक स्वामीजींच्या मंगल सानिध्यात व व प्रतिष्ठाचार्य प्रो. डॉ. महावीर प्रभाचंद्र शास्त्री यांच्या मार्गदर्शनात सोहळा संपन्न होत आहे. या परम पुण्यप्रसंगी मंदिरशुद्ध शिखरी दि शुद्धी व कलिकुड पार्श्वनाथ विधान आदीच्या भव्य आयोजनात आपण सहपरिवार उपस्थित राहून धर्मलाभ घ्यावा ही अशी विनंती करण्यात आली आहे .

मांगलिक कार्यक्रम पुढील प्रमाणे -

शुभप्रभात मंगलाच जलपूजन व पटयाचा ध्वजारोहण, महाद्वार उद्घाटन ,अखंड दीप कलश स्थापना , श्रीजिनाभिषेक, शांतिधारा शुभप्रभात मंगलवा अभिनव दिशा बीजाक्षर जाप ,
श्री जिनेंद्राभिषेक व पूजन, श्री कलिवुड पार्श्वनाथ विधान अभिनंदन सभा, त्यागी प्रवचन यागमंडल आराधना ,नूतन खार्पण पालखी महोत्सव व त्यानंतर महाप्रसाद असणार आहे असे श्री दिगंबर जैन माणिकस्वामी महाराज मंदिर यांचे मार्फत सांगण्यात आले आहे.
close