shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बारामती निर्भय पथकाने इंदापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांना भेट देऊन निर्भया पथकाची करून दिली ओळख.

बारामती निर्भय पथकाने इंदापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांना  भेट देऊन निर्भया पथकाची करून दिली ओळख.
इंदापूर प्रतिनिधी: लहान मुलावरती अत्याचाराचे गुन्हे घडू नयेत, मुलांनी स्वतःची काळजी कशी घ्यावी यासंदर्भात मुलांमध्ये मिसळून जागृती करण्याचे काम बारामतीचे निर्भय पथकाने इंदापूर तालुक्यातील अनेक जिल्हा परिषद शाळेमध्ये जाऊन भेटी देऊन निर्भया पथकाची ओळख करून दिली.
बारामती निर्भया पथकाने  गणेश इंगळे उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर पोलीस स्टेशन अंकित बावडा दूरक्षेत्र हद्दीत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बावडा, नरसिंहपुर, आसबे वस्ती व खंडोबा वस्ती या शाळेला भेट देऊन पहिली ते चौथीचे विद्यार्थ्यांना अलीकडच्या काळामध्ये लहान मुलांवरील घडणारे गुन्ह्यांचे संदर्भात चांगला स्पर्श, वाईट स्पर्श, तो कोण करतो लहान मुलावरील अत्याचाराचे जे गुन्हे घडतात ते कसे घडतात. काय करावे .काय करू नये .स्वतःची काळजी कशी घ्यावी .आई-वडिलांना प्रत्येक गोष्टीची माहिती द्यावी अशी माहिती देऊन मुलांना निर्भया पथकाची ओळख करून दिली. पोलीस काका पोलीस दीदी असे समजून मुलांना हसत्या खेळत्या वातावरणात आनंदी जीवन जगावे घाबरू नये अशी माहिती दिली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक मोरे सर, कांबळे सर, पारडे सर व शाळेच्या शिक्षिका सौ साळुंके मॅडम, निर्भया पथकाचे महिला पोलीस हवालदार अमृता भोईटे, अंजली नागरगोजे, माया भोईटे, उमा कोकरे, रूपाली थोरात ,पोलिस अंमलदार सुनील धगाटे, प्रवीण अभंग तसेच महिला छायाताई पडसळकर व महिला दक्षता कमिटी इंदापूरच्या सदस्या अनिताताई खरात असे उपस्थित होते. 
close