shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जरे हत्याकांडाची नियमित सुनावणी 6 सप्टेंबरपासून ; बोठेसह सहा आरोपींना न्यायालयासमोर केले होते हजर..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
गुरूवार दिनांक २५ ऑगस्ट २०२२

जरे हत्याकांडाची नियमित सुनावणी 6 सप्टेंबरपासून ; बोठेसह सहा आरोपींना न्यायालयासमोर केले होते हजर..!!

अहमदनगर : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा स्व. रेखा जरे खून खटल्यातील आरोपी बाळ बोठेसह सहा जणांना दोष निश्चितीसाठी बुधवारी येथील जिल्हा न्यायालयात आणण्यात आले होते. दरम्यान बोठेसह इतर दोघांचे विविध अर्ज न्यायालयासमोर आल्यामुळे दोषनिश्चिती झाली नाही. सर्व अर्जांवर आता 6 सप्टेंबरला सुनावणी होणार आहे. तसेच खटल्याप्रकरणी नियमित सुनावणीही 6 सप्टेंबर पासून सुरू होणार आहे. यावेळी सर्व आरोपींना हजर ठेवण्याचे निर्देश न्यायालयाकडून देण्यात आले आहेत.

30 नोव्हेंबर, 2020 रोजी जरे यांची नगर-पुणे महामार्गावर गळा चिरून हत्या करण्यात आली होती. बाळ बोठे हा या खुनाचा मुख्य सूत्रधार असल्याचे तपासात समोर आल्यानंतर बोठेसह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पसार बोठे याला हैद्राबाद येथून अटक करण्यात आली होती. पसार असताना त्याला मदत करणार्‍या आणखी सहा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

या खटल्यातील एकूण 12 पैकी सहा जणांना जामीन मंजूर झालेला आहे. तर सहा जण न्यायालयीन कोठडीत आहेत. बोठेसह या सहा जणांना बुधवारी सुनावणीवेळी न्यायालयात आणण्यात आले होते.

बोठे याच्यावतीने न्यायालयात अर्ज करण्यात आला होता. तपासादरम्यान जप्त करण्यात आलेला मोबाईल, दुचाकी मिळावेत व बँकेतील खात्यांवर व्यवहार सुरू करण्याबाबत परवानगीसाठी न्यायालयाकडे मागणी करण्यात आली होती. यावर बोठे याच्या वतीने अ‍ॅड. महेश तवले यांनी बाजू मांडली. तर सागर भिंगारदिवे याने 15 दिवसांच्या जामीनाची मागणी केली होती. त्याच्या वतीने अ‍ॅड. रोमान सय्यद यांनी बाजू मांडली. आदित्य चोळके याच्याकडूनही अर्ज करण्यात आला होता. या सर्व अर्जांवर सुनावणी झाली. मयत जरे यांचा मुलगा रूणाल जरे यांच्या वतीने अ‍ॅड. सचिन पटेकर यांनी बाजू मांडत आरोपींच्या जामिनाला विरोध दर्शवला. विशेष सरकारी वकील उमेशचंद्र यादव यांच्या वतीने त्यांचे सहकारी अ‍ॅड. जोशी यांनी बाजू मांडली.


दरम्यान, या सर्व अर्जांवर आता 6 सप्टेंबरला सुनावणी होणार आहे. तसेच रेखा जरे खून खटल्याप्रकरणी नियमित सुनावणीही 6 सप्टेंबर पासून सुरू होणार आहे. यावेळी सर्व आरोपींना हजर ठेवण्याचे निर्देश न्यायालयाकडून देण्यात आले आहेत.

Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600



close