shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळातही मातीच्या बैलांचे महत्व टिकून..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
गुरूवार दिनांक २५ ऑगस्ट २०२२

आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळातही मातीच्या बैलांचे महत्व टिकून..!!

अहमदनगर : बैल पोळा सणानिमित्त मातीच्या बैलांची मागणीत वाढ झाली.आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात बैलांची संख्या कमी होऊन ट्रॅक्टरची संख्या वाढल्याने बैलपोळा सणाला पूजेसाठी मातीच्या बैलांचे महत्व टिकून असल्याने मातीच्या बैलांना वाढती मागणी आहे.
उद्या शुक्रवार दि.२६ ऑगस्ट रोजी बैल पोळा सण आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने बैल पूजेला अनन्य साधारण महत्व आहे.ज्यांचे कडे खरे खुरे बैल आहेत त्यांची बैल धुणे, त्यांना सजविण्याच्या लगबग सुरू आहे.आधुनिक युगात प्रगत तंत्रज्ञानामुळे बैलांची जागा ट्रॅक्टरने घेतली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस बैलांची संख्या कमी कमी होत आहे.त्यामुळे पोळा सणाला बैल पूजा करण्यासाठी मातीच्या बैलांना महत्व प्राप्त झालेले आहे.त्यामुळे मातीच्या बैलांची मागणीत वाढ झाल्याचे दिसून येते.भेंडा येथे लहान 5 बैल 20 रुपयांना,छोटी बैल जोडी ११० रुपयाला तर मोठी बैल जोडी २५० रुपयांना विकली जात आहे.

करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गेली दोन वर्षे पोळा सण झालेला नाही.त्यामुळे यावेळी शेतकऱ्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे.पोळा सणाकरिता चौर, हिंगुळ, बेगड, शिंगदोरी, नवीन कासरा, शेंब्या, झुल, घुंगर माळ, घोगर पट्टा आदी साहित्य खरेदी करण्याची गलबग सुरू झाली आहे.

Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600





close