shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न प्राधान्याने सोडविले जातील-विजयकुमार परीट

प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न प्राधान्याने सोडविले जातील-विजयकुमार परीट
इंदापूर प्रतिनिधी:इंदापूर तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न प्राधान्याने सोडविले जातील.कोरोना काळात तालुक्यातील सर्व शिक्षकांनी अतिशय छान कामगिरी बजावली आहे. गुणवत्तावान शिक्षक आहेत ,त्यांनी आपली गुणवत्ता जिल्ह्यात दाखवून दिली आहे.पंचायत स्तरावरील शिक्षकांचे प्रश्न प्रलंबित ठेवले जाणार नाहीत. कोणत्याही शिक्षकांना हेलपाटे मारायची वेळ येऊ देणार नाही.असे विजयकुमार परीट यांनी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाच्या तालुका कार्यकारणीसोबत असलेल्या बैठकीत मत व्यक्त केले.
यावेळी गटशिक्षणाधिकारी अजिंक्य खरात , कास्ट्राईबचे तालुकाध्यक्ष सुहास मोरे , महासचिव शशिकांत मखरे ,महिला आघाडी प्रमुख मनिषा ननावरे ,महासचिव ज्योती भोसले , राज्यसंघटक सदाशिव रणदिवे ,जिल्हा महासचिव मिलिंद देटगे , जिल्हा संघटक रतिलाल कुचेकर , उपाध्यक्ष सुनिल भोसले , तात्या मसलखांब, नितीन मिसाळ, मंगेश शेंडे, सचिन लोंढे , ज्ञानेश्वर कुचेकर इ.पदाधिकारी आणि 
 अर्थ विभागातील लिपिक डि.एन. घारे, शिक्षण विभागाचे कक्ष अधिक्षक एस.ए.जगताप ,लिपिक वैभव लवटे उपस्थित होते.
यावेळी कास्ट्राईब शिक्षक महासंघाच्या वतीने खालील मागण्या मांडण्यात आल्या.
१) प्रलंबित मेडिकल अर्जित रजा इतर फरक बिले तातडीने मंजूर करण्यात यावीत.
२) मेडिकल बिलांची परीगणना  पंचायत समितीतच करण्यात यावी.
३) शिक्षकांना प्रशासकीय कामासाठी पंचायत समितीत वारंवार हेलपाटे मारण्याची वेळ येऊ नये यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात.
४) अपूर्ण राहिलेल्या सेवा पुस्तकातील नोंदी तातडीने पूर्ण करून मूळ आणि दुय्यम सेवा पुस्तक अपडेट करण्यासाठी कॅम्प लावले जावेत.
५)शिक्षणसेवक कालावधी पूर्ण झालेल्या शिक्षण सेवकांना नियमित वेतनश्रेणीत घेण्यासाठीचे प्रस्ताव तातडीने जिल्हा परिषदेकडे पाठवण्यात यावेत.
६)मागील वर्षी शिक्षक पुरस्कारासाठी निवड झालेल्या शिक्षकांना  पुरस्कार देण्यात यावेत.
७) यावर्षी गुणवंत पुरस्कार सोहळा वेळतच घेण्यात यावा.सन २०२१-२२ आणि सन २०२२-२३असे दोन वर्षाचे पुरस्कार देण्यात यावेत.
८)शिक्षणपरिषदा सोमवार ते शुक्रवार यापैकी कोणत्याही एका दिवसात करण्यात याव्यात.
९)पेन्शनधारक शिक्षकांच्या अडचणींवर तातडीने कार्यवाही करण्यात यावी.
१०) CRC वर मुख्याध्यापकांसाठी वारंवार येणाऱ्या सुचना / आदेश यांचे प्रमाण कमी करणेबाबत.
११) १५ दिवसांच्या आतील अर्जित रजांचा पगार न कापता तो तसाच पगारात अदा करण्यात यावा.
१२) शिक्षकांची अशैक्षणिक कामे बंद करावीत.त्याचप्रमाणे शैक्षणिक प्रयोगही कमी करावेत.*फक्त शिकवू द्या* मोहिमेस सहकार्य करावे.
१३) फंड स्लिपा मिळाव्यात व फंड प्रस्तावातील त्रुटी पंचायत समिती स्तरावर दूर करण्यात याव्यात.
१४) दरमहा १ तारखेला पगार करण्यात यावा.
१५) रेडा गावच्या प्रकरणात प्रशासनाने शिक्षकांच्या पाठीशी उभे रहावे.
१६) सरस्वती नगर शाळा पाचवी वर्गाचा पट भरणेसाठी टॅब उपलब्ध करणेबाबत.
१७)माजी केंद्रप्रमुख उत्तम कुचेकर यांची वेतनवाढ कपातीचा निर्णय मागे घेण्यात यावा.
१८) ग्रामसेवकांनी प्राथमिक शिक्षकांना ग्रामस्तरावरून आदेश देण्यात येऊ नयेत.पंचायत समिती स्तरावरून आदेश यावेत.
 वरिल मागण्या तत्परतेने सोडविल्या जाव्यात असे कास्ट्राईब शिक्षक महासंघाच्या वतीने विनंती करण्यात आली.
close