shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

न्यू इंग्लिश स्कूल शिंगवे नाईक येथे डिजिटल क्लासरूमचा लोकार्पण सोहळा विविध मान्यवरांच्या हस्ते उत्साहात संपन्न....

नगर । प्रतिनिधी :-
नगर तालुक्यातील शिंगवे नाईक येथील अहमदनगर जिल्हा मराठा संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूलमध्ये, बुद्धवासी रघुनाथ सखाराम जाधव यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ डिजिटल क्लासरूमचा लोकार्पण सोहळा, अहमदनगर जिल्हा मराठा संस्थेचे सचिव, माननीय जी डी खानदेशे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अहमदनगर जिल्हा परिषदेचे उपशिक्षणअधिकारी  बाळासाहेब धनवे साहेब, विश्वस्त मुकेश दादा मुळे, तसेच दीपक दरे उपस्थित होते. 
त्याचप्रमाणे या डिजिटल क्लासरूमच्या लोकार्पण सोहळ्याला शिंगवे नाईक येथील ज्येष्ठ शिक्षणप्रेमी विश्वासरावजी जाधव त्याचप्रमाणे ज्यांनी न्यू इंग्लिश स्कूल शिंगवे  विद्यालयाला आधुनिक व अद्यावत असा डिजिटल क्लासरूम लोकार्पण केला असे पेमराज सारडा कॉलेजचे माजी प्राचार्य डी. आर. जाधव सर, त्याचप्रमाणे विद्यालयातील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी जिल्हा मराठा संस्थेचे पदाधिकारी विद्यालयाचे मुख्याध्यापक व ग्रामस्थ यांनी डी. आर.जाधव सर यांचा यथोचित सन्मान केला. 

यावेळी बोलताना डी आर जाधव सर म्हणाले की या विद्यालयातील विद्यार्थ्यांपैकी या डिजिटल क्लासरूमचा वापर करून एक विद्यार्थी जरी आयपीएस झाला तरी मी केलेल्या खर्चाचे सार्थक झाले असे उद्गार काढून विद्यालयातील शिक्षकांना व विद्यार्थ्यांना संबोधित केले. अशाप्रकारे डी आर जाधव सर यांनी पारंपारिक पुण्यस्मरण कार्यक्रमाला फाटा देऊन जनतेला संदेश देणारे आपल्या वडिलांचे एक आगळे वेगळे पुण्यस्मरण न्यू इंग्लिश स्कूल शिंगवे नाईक विद्यालयात साजरे 
केले. या लोकार्पण सोहळ्यानिमित्ताने विद्यालयातील विद्यार्थी संस्थेचे पदाधिकारी व ग्रामस्थ व शिक्षक यांना सात्विक भोजनाचे नियोजनहित जाधव सर यांनी केली होते.
close