shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचेकडून भारतीय सैन्य दलाच्या अग्निवीर भरती करिता राज्यभरातून आलेल्या हजारो युवकांना जेवण,पाणी,राहणे सर्व व्यवस्था केली मोफत..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
मंगळवार दिनांक ३० ऑगस्ट २०२२
माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचेकडून भारतीय सैन्य दलाच्या अग्निवीर भरती करिता राज्यभरातून आलेल्या हजारो युवकांना जेवण,पाणी,राहणे सर्व व्यवस्था केली मोफत..!!

राहुरी : येथील महात्मा कृषी विद्यापीठ परिसरात. भारतीय सैन्य दलात अग्निवीर भरती सुरू आहे .या भरती प्रक्रियेसाठी कृषी विद्यापीठ येथे भारतीय सैन्य दलात भरतीसाठी राज्यभरातून हजारो युवक येथे पोहोचले आहेत.
या सर्वांना मोफत जेवण्याची व्यवस्था राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आमदार प्राजक्त तनपुरे ह्यांचे वतीने करण्यात आली आहे .अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शहराध्यक्ष संतोष आघाव व युवक तालुका अध्यक्ष धिरज पानसंबळ ह्यांनी दिली.
अग्निवीर भरतीसाठी केंद्र सरकारच्या संरक्षण विभागाचे वतीने 24 ऑगस्ट 2022 पासून भरती प्रक्रिया सुरु झाली असून सदर भरती 19 सप्टेंबर 2022 पर्यंत असून ह्या भरती प्रक्रियेसाठी राज्या भरातून हजारो युवक येत आहे. ह्या सर्वांना राहण्याची जेवण्याची सुविधा कृषी विद्यापीठ उपलब्ध करून देऊ शकत नसल्याने त्या युवकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी राहुरी नगर पाथर्डीचे आमदार प्राजक्त तनपुरे ह्यांचे वतीने जेवण भरती प्रक्रियेच्या ठिकाणी जागेवर करण्यात येणार असून बरोबर आमदार तनपुरे ह्यांचे वतीने मोफत स्वच्छ गार पाणी देण्यात येणार आहे.पाण्याची एक मोबाईल व्हॅन ठेवण्यात आले असून सदर पाणी १ रुपया लिटर पुरविण्यात येईल. तसेच श्री तनपुरे यांनी भरती प्रक्रियेस येणाऱ्या युवकांची राहण्याची मोफत व्यवस्था राहुरी शहरातील केशर मंगल कार्यालयात करण्यात आली असून तिथे सर्व व्यवस्था करण्यात आली आहे.
 अग्निवीर भरती आलेल्या युवकांची जेवण राहाणे ह्या कामाचे नियोजनाची जबाबदारी आमदार प्राजक्त तनपुरे व युवा नेते हर्ष तनपुरे ह्यांचे मार्गदर्शना खाली माजी नगरसेवक नंदकुमार तनपुरे, गजानन सातभाई शहाजी जाधव महेश उदावंत, गौरव तनपुरे प्रवीण कदम कैलास शेटे सर मदन तनपुरे आदि करीत आहे.
 फोटो अग्निवीर भरती साठी आलेल्या युवकांना मोफत जेवणाची व्यवस्था आमदार प्राजक्त तनपुरे ह्यांनी केली असून यावेळी नंदकुमार तनपुरे शहाजी ठाकूर संतोष आघाव महेश उदावंत मदन तनपुरे प्रवीण कदम गौरव तनपुरे आदि.

Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close