shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मराठा आरक्षण आंदोलनातील लढाऊ नेता हरपला - हर्षवर्धन पाटील

मराठा आरक्षण आंदोलनातील लढाऊ नेता हरपला - हर्षवर्धन पाटील 
इंदापूर : प्रतिनिधी दि.14/8/22
          मराठा आरक्षण आंदोलनातील आक्रमक असा लढाऊ नेता हरपला आहे. मराठा समाजातील तरुणांना शिक्षण व नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळवून देणे ही विनायक मेटे यांना खरी श्रद्धांजली ठरेल, या शब्दात भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
     शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष आ. विनायक मेटे यांचे पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर रविवारी पहाटे निधन झाले. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील ग्रामीण भागातून आलेले हे नेतृत्व महाराष्ट्रभर फुलले. मराठा समाजातील तरुणांना आरक्षण मिळवून देणे हे त्यांच्या जीवनाचे ध्येय होते. अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या शिवस्मारक समितीचे आ. विनायक मेटे अध्यक्ष होते. या लढावू नेत्याच्या आकस्मित जाण्याने राज्यातील राजकीय, सामाजिक चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे, अशी प्रतिक्रिया हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली वाहताना व्यक्त केली.
_____________________________

close