कालठण नं १ गावातील जिल्हा परिषद शाळेतील मुलांना दानशूर व्यक्तींकडून गणवेश वाटप.
इंदापूर प्रतिनिधी:कालठण नं १गावातील जिल्हा परिषद शाळेत मुलांना गणवेश वाटप करण्यात आले आहे.
मेजर मारूती मोहन भोई , धीरज बिभीषण जाधव यांनी प्रत्येकी पाच-पाच गणवेश तर माजी उपसरपंच आण्णासाहेब कोळेकर यांनी दोन गणवेश दीले. हे गणवेश ७५ व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने वाटत केले आहेत.
यावेळी हनुमंत जाधव संचालक कर्मयोगी शं.पाटील स.सा.कारखाना,शालेय समितीचे अध्यक्ष आण्णासाहेब धोत्रे,उपाध्यक्ष प्रमोद चव्हाण,उपसरपंच तुकाराम पांडुळे, माजी उपसरपंच आण्णासाहेब कोळेकर, ब्रह्मदेव सपकळ उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, सदस्य संतोष पाडुळे,मेजर मारूती भोई, धीरज जाधव, शशिकांत पाटील, संतोष सपकळ, महादेव भोई,बबन चोरगे, नागनाथ गायकवाड,शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र जगताप गुरुजी, घुले गुरुजी, बोराटे गुरुजी, राऊत मॅडम इत्यादी उपस्थित होते.

