shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्रीनाथ विद्यालय वडापुरी येथे भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त केला माजी सैनिकांचा सत्कार .

श्रीनाथ विद्यालय वडापुरी येथे भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त केला  माजी सैनिकांचा सत्कार .
इंदापूर प्रतिनिधी: शनिवार दिनांक १३ ऑगस्ट २०२२ रोजी श्रीनाथ विद्यालय वडापुरी या ठिकाणी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सेवानिवृत्त सैनिक यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.
 याप्रसंगी श्रीनाथ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष पोपट बागल तसेच उपाध्यक्ष राजेंद्र नलवडे, संचालक दत्तात्रेय शिर्के, जनार्दन देवकर, अरुण फडतरे, निवृत्ती शिर्के यांच्या शुभहस्ते सर्व सेवानिवृत्त सैनिकांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी माजी सैनिक  बापूसाहेब पाटील आणि श्रीनाथ शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक श्री जनार्दन देवकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .
कार्यक्रमाचे आयोजन विद्यालयाचे मुख्याध्यापक तपासे सर तसेच सहकारी शिक्षक खताळ सर, पासगे सर, पवार मॅडम, थोरात मॅडम व शिक्षकेतर कर्मचारी शिर्के सर व मदने यांनी केले
 कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन विद्यालयाच्या शिक्षिका सौ शिर्के मॅडम यांनी केले.
close