shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर शहर भाजपाच्या वतीने 14 ऑगस्ट रोजी रात्री तिरंगा मशाल फेरी*

*इंदापूर शहर भाजपाच्या वतीने 14 ऑगस्ट रोजी रात्री तिरंगा मशाल फेरी*
   इंदापूर प्रतिनिधी:भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवानिमित्त तसेच हर घर तिरंगा अभियानांतर्गत स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला भारतीय जनता पक्षाचे नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर शहर भारतीय जनता पक्ष व श्री. पांडुरंग (तात्या) शिंदे मित्रपरिवाराच्या वतीने दि. 14 ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजता तिरंगा मशाल फेरीचे आयोजन केले आहे. इंदापूर शहरातील दर्गा  मस्जित चौकापासून तिरंगा मशाल फेरी ची सुरुवात होणार आहे.
      या मशाल फेरीमध्ये सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष शकीलभाई सय्यद आणि श्री. पांडुरंग (तात्या )शिंदे मित्रपरिवाराने केले आहे .
close