shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

काही पोलिस व गुंडांच्या त्रासाला कंटाळून सामाजिक कार्यकर्त्याचा आत्मदहनाचा निर्णय..!

आत्मदहन करण्याची परवानगी द्या..,राज्यात कायद्याचे राज्य की पोलिस आणि गुंडांचे ?- वहीद खान

नांदुरा ( प्रतिनिधी) : सध्या महाराष्ट्र राज्यात राज्य नेमके कायद्याचे की पोलिस आणि गुंडांचे? अशी स्थिती निर्माण झाली आहे,गुंडांना हाताशी धरुन तथा त्यांची पाठराखण करुन सर्वसामान्य नागरीक, पत्रकार, समाजसेवकांना वेठीस धरत त्यांची जाणिवपूर्वक छळवणूक केली जात असल्याचे निदर्शनास येत आहे.

सविस्तर असे की,दिनांक १३/०६/२०२१ रोजी स्थानिक नांदुरा (जि.बुलढाणा) पोलिसांनी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार असलेल्या वहीद खान व शाकीरउल्लाह खान यांच्या राहत्या घरात बळजबरीने घूसून त्यांच्या कुटुंबातील माता-भगीनी, पत्नी वर केलेली बेकायदेशीर कारवाई आणि अत्याचाराबाबत श्री.खान यांनी अनेक लिखित तक्रारी संबंधित खात्याच्या वरिष्ठ कार्यालयात सादर केल्या आहेत, यावर त्यांच्या फिर्याद व तक्रारींची दखल न घेता उलट तक्रार मागे घेणयासाठी दबाव आणले जात आहे, आणि पुन्हा ( FIR ३१९/२०२१ पो.स्टे. नांदुरा ) सारखा खोट्या आरोपात अटक करीन असे धमक्या त्यांना दिल्या जात आहे.

गुंड प्रवृत्ती असलेल्या आत्ताउल्लाहखानला हाताशी धरून सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार असलेल्या वहीद खान व शाकीरउल्लाह खान यांना जीवे ठार मारण्याचे धमक्या दिल्या जात आहे.वहीद खान गावात नसताना त्यांच्याविरुद्ध पोलिसांत तोंडी खोटी तक्रार देवून, कटकारस्थान रचून, सुड बुद्धीने दिनांक ०३/०१/२०२२ रोजी खोटी NC ( NCR १०/२०२२ - दिनांक ०३/०१/२०२२ पो. स्टे. नांदुरा ) दाखल केली आणि त्यावर मा.जिल्हा सत्र न्यायालय व स्थानिक गुन्हे शाखेने दिलेले वहीद खान व शकिर खान यांची जमीन रद्द व्हावी या साठी पोलिसांनी प्रकरण Cri.M.A/०४/२०२२ मा. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय मलकापूर येथे
दाखल केले, ते  मा. न्यायालयाने फेटाळले, बुलढाणा पोलिस प्रशासन CrPC १५४ (१) आणि १५४ (३) चे पालन करून त्यांची फिर्याद नोंदवत नाही, याकामी पोलिस प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे आणि आरोपींची पोलिस अधिकाऱ्यांकरवी पाठराखण करून पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्त्यास जाणिवपूर्वक मानसिक,आर्थिक, सामाजिक व शारीरिक त्रास दिला जात आहे. त्यांच्या तक्रारीवर कोणत्याही प्रकारची निर्पेक्ष कारवाई न करता अक्षरशः लोकशाहीचा अवमान केला जात आहे.

वहीद खान व त्यांचा कुटुंब सदरील छळ प्रकरणामुळे खूपच मानसिक त्रासामध्ये आहेत, मानसिक त्रासमुळे आता त्यांच्या समोर आपले जीवन संपविण्या वितिरिक्त इतर कोणताच पर्याय दिसत नसल्याने, नित्याच्याच होणाऱ्या मानसिक त्रासमुळे रोजरोजच मरून जगण्यापेक्षा एकच वेळी कायमचे मेलेले बरे असा शेवटी त्यांनी त्रस्त होत निर्णय घेतला आहे, याकरीता येत्या १५/०८/२०२२ या देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनी त्यांनी आपली जिवनयात्रा संपविण्यासाठी पोलिस महासंचालक महाराष्ट्र राज्य आणि शासनाकडे आत्मदहन करण्याची लिखित परवानगी मागीतली आहे.मात्र पत्राचे कोणतेही लेखी उत्तर न आल्यास संबंधितांची मौन परवानगी समजून आत्मदहनाचा मार्ग स्वीकारला जाईल याची नोंद घ्यावी असेही वाहिदखान यांनी यापत्रात शेवटी नमुद केले आहे.
close