shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

युवा सेना नाशिक जिल्हा प्रमुखांच्या वाढदिवसानिमित्त आश्रम शाळेला शालेय वस्तूंचे वाटप



प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

नाशिक: दि. १४/ नाशिक जिल्हा युवा सेना प्रमुख मा.श्री फरहान दादा खान यांच्या वाढदिवसानिमित्त आश्रम शाळेंना शाळेय वस्तूंचे वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला. या मध्ये वह्या पुस्तके व आश्रम शाळेतील मुलांना इतर वापरात येणार्या वस्तूंचे वाटप करण्यात आले. 

श्री फरहान दादा खान यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून आश्रम शाळेतील मुलांना मदत करून वाढदिवस साजरा केला व सर्वांना वायफळ खर्च न  करता समाजसेवा करण्यासाठी प्रेरित केले. आश्रम शाळेतर्फे श्री खान यांचे आभार व्यक्त केले व त्यांना शुभेच्छा दिल्या. 

या प्रसंगी कलश कैलास पाटेकर, प्रथमेश (सोनू) गिरमकर, हरिष केकाण, सर्वज्ञ (छोटू) गिरमकर, शितिष दिवटे, रोहित थोरात, विशाल दर्गुडे, रोहन शिंदे, दानिश शेख, तेजस बिडवे, उपस्थित होते. या सर्वांनी श्री खान यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
close