shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

रक्षाबंधन विशेष : राखीच्या धाग्यातून जपले जाते ऋणानुबंध...!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
बुधवार दिनांक १० ऑगस्ट २०२२

शिर्डी एक्सप्रेस : रक्षाबंधन विशेष : राखीच्या धाग्यातून जपले जाते ऋणानुबंध...!!

अहमदनगर : 🏵️ रक्षाबंधन म्हणजे बहीण-भावाच्या प्रेमाचे बंधन आहे. या प्रेमाच्या बंधनाचा सण अवघ्या दाेन दिवसांवर येऊन ठेपला आहे. राख्या खरेदीसाठी आता बाजारात गर्दी हाेऊ लागली आहे. चोवीस रुपयांपासून ते ५०० रुपयांपर्यंत राख्या बाजारात विकल्या जात आहे. 

👩‍👩‍👦‍👦 राख्या खरेदीसाठी गर्दी...

गेल्या दाेन वर्षांपासून काेराेनाचे संकट हाेते. त्यामुळे सण-उत्सव अगदी साधेपणाने साजरे झाले. यंदा सरकारने सर्व निर्बंध सैल केल्याने आनंदाचे वातावरण आहे. गुरुवारी ११ ऑगस्ट राेजी रक्षाबंधन हाेत असल्याने बाजारात राख्या खरेदीसाठी गर्दी दिसत आहे.
🤷🏻‍♂️ किमतीत 5% वाढ.........

बाजारात साध्या धाग्यापासून डिजिटलपर्यंत विविध प्रकारच्या राख्या दुकानांमध्ये आहेत. मुंबई, दिल्ली, राजकोट येथून व्यापाऱ्यांनी राख्या मागवल्या आहे. लहान मुलांसाठी डोरेमॉन, छोटा भीम, मोटू पतलू, मिकी माऊस आदी वेगवेगळ्या कार्टून्सच्या राख्यांना ग्राहकांची पसंती आहे. ज्वेलरी, ब्रेसलेट, डायमंड आदी राख्यांना चांगली मागणी आहे. मागील वर्षापेक्षा यंदा राख्यांच्या किंमतीत पाच टक्के वाढ झाली आहे.

Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600


close