प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
करमाळा: दि. ९ / भारतीय स्वातंत्र्या च्या अमृत महोत्सव वर्षा निमित्त तालुका स्तरीय विविध स्पर्धाचे आयोजन भाजपा युवा मोर्चा च्या वतीने करण्यात आले असल्याची माहिती भाजपा युवा मोर्चा चे प्रदेश सचिव दिपक चव्हाण यांनी दिली.
या स्पर्धां मध्ये बुद्धीबळ स्पर्धा, निबंध स्पर्धा, ऑनलाइन राष्ट्रभक्ती गीत गायन स्पर्धा, पारंपरिक वेशभुषा स्पर्धा या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असुन वेशभुषा स्पर्धा 4 थी पर्यंतच्या मुला व मुली करिता असतील. निंबध स्पर्धेचे ५ वी ते ७ वी गट, ८वी ते १२ वी गट, एफवाय ते पदव्युत्तर खुला या गटासाठी होतील. बुद्धिबळ ही स्पर्धा १४ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत कन्या शाळा देवीचा माळ रोड येथे तीन गटात संपन्न होतील राष्ट्रभक्ती गीत गायन स्पर्धा वरील तीन गटात संपन्न होईल.
वरील सर्व स्पर्धेसाठी नोंदणी नियम व अधिक माहिती साठी खालील नंबरवर संपर्क साधावा. नरेंद्रसिंह ठाकुर (9423333975 )
सचिन चव्हाण (9021744844)
संतोष कांबळे( 9527474495)
गोपाल वाघमारे( 8208394675)
प्रेमसिंग परदेशी (9970665835)
अश्विनी भालेराव (8793346732 )
या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

