शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी -किरण घाटे.
मंगळवार दिनांक ०९ ऑगस्ट २०२२
चंद्रपूरात येत्या ९ ऑगस्टला भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन..!!
चंद्रपूर ▪️किरण घाटे▪️
चंद्रपूर : आम आदमी पार्टी चंद्रपुर महिला अध्यक्षा ॲड.सुनिता पाटील यांनी आपली कन्या डॉ. जास्मिन मनोहर पाटील यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधुन (वाढती बेरोजगारी लक्षात घेता) मंगळवार दि. 9 ऑगस्ट 2022 रोजी (सकाळी १० ते सांय.५वाजे पावेतो) निःशुल्क रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे.
बेरोजगार युवा, युवतींना रोजगार मिळावा हा उद्देश्य डोळ्यांसमोर ठेऊन त्या आपल्या मुलीचा वाढदिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करीत आहे . 10 वी, 12 वी, डिप्लोमा, पदवीधर, आय. टी .आय, इंजिनिअर उमेदवार यांना या मेळाव्यात संधी मिळणार असून सर्व बेरोजगार युवा युवतीनीं या मेळावाचा लाभ घ्यावा.असे आवाहन ॲड.सुनिता पाटील यांनी केले आहे.
⬜ॲड.सुनिता पाटील ⬜
सदरहु मेळावा आम आदमी पार्टी चंद्रपुर कार्यालय (नेहरू कॉलेज समोर, घुटकाळा वार्ड, चंद्रपुर) येथे आयोजित करण्यात आला असल्याची माहिती आम आदमी पार्टीच्या वतीने देण्यात आली आहे.
Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @किरण घाटे चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी📲+91 92844 99128

