"भोसरी येथील नारायण हट शिक्षण संस्थेच्या प्री- प्रायमरी शाळेत विद्यार्थ्यांना शेती विषयक शिक्षण(ज्ञान/माहिती)-शाळेच्या परसबागेत फुलवली शेती शेतात श्रमदानातून विविध फुले, भाजीपाला,फळे, यांची केली लागवड"
भोसरी । प्रतिनिधी :-
विद्यार्थ्यांमध्ये शेती विषयक माहिती व्हावी, शेतातील पिके व शेती उपयोगी साहित्या विषयी माहिती व्हावी, आणि जे दैनंदिन जीवनात अन्नधान्य वापरतो भाजीपाला वापरतो फळे वापरतो ती कसी पिकविली जातात,तयार होतात याची माहिती व्हावी, चैतन्य निर्माण व्हावे, स्वानंद मेळावा, श्रमाचे मूल्य विकसित व्हावे, त्यांच्यामध्ये विविध मूल्यांची रुजवणूक व्हावी, भारतीय पारंपारिक शेती व्यवसायाविषयी, सेंद्रिय शेती विषयमाहिती व्हावी/ जाणीव निर्माण व्हावी,या उद्देशाने प्रत्यक्ष कृतीतून शेती ज्ञान देण्याचा उपक्रम आयोजित करण्यात आला.
सोमवार दिनांक ८/८/२०२२ रोजी सकाळी १०:३० ते १२:०० या वेळेत नारायण हट शिक्षण संस्थेच्या शाळेच्या सभोवतालच्या परसबागेत दहा गुंठे(१०) जागेवर विविध शेती पिकांच्या रोपांचे, बियांचे, रोपण (लागवड) विद्यार्थ्यांच्या, शिक्षकच्या पालकच्या, सोसायटीतील सभासदच्या, संस्था पदाधिकाऱ्यांच्या मदतीने श्रमदानातून करण्यात आले.
या पिकांमध्ये दोडका, भोपळा, कारले, तोंडले, घोसाळे, या वेलवर्गीय पिकांच्या बिया लावण्यात आल्या. त्याचप्रमाणे भेंडी, पालक, चवळी, गवार, मटार, फरसबी , वालवड,या भाजीपाला विषयक बियांची लागवड करण्यात आली.वांगी, मिरची, टोमॅटो,शेवगा, पपई, केळी, ऊस, झेंडू यांच्या तयार रोपेची लागवड करण्यात आली.
या शेती विषयक उपक्रमातून शहरी भागातील विद्यार्थ्यांना शेतीविषयक माहिती मिळण्यास बहुमोल मदत झालीअसून स्वतः शेतीत पिके लागवडीचाआनंद विद्यार्थ्यांना घेता आला. यापुढेही त्यांना विविध गोष्टींची माहिती त्यातून मिळणार आहे.लागवड केलेल्या सर्व शेतीमालाचे संगोपन विद्यार्थी, शिक्षक, पालक स्वतः वेळ देऊन सामूहिक श्रमदानातून करणार आहेत. शेतात तयार झालेला भाजीपाला फळे व इतर उत्पादित पिकांचे वाटप विद्यार्थ्यांना वेळोवेळी केले जाणार आहे.
पिकांचे संगोपन करताना नैसर्गिक पद्धतीने जनावरांच्या शेणखताचा (सेंद्रिय खतांचा), जीवामृत सारख्या औषधांचा वापर करून सेंद्रिय शेतीचा प्रसार करण्यावर भर दिला जाणार आहे.शाळेतील विद्यार्थ्यांना लागवड करण्यात आलेल्या सर्व पिकांविषयी माहिती शिक्षण संस्थेचे संचालक मा. श्री. अंकुशराव गोरडे यांनी दिली.
शेतात उपयुक्त असणाऱ्या खुरपे, विळा, घमेले , फावडे, टिकाव, याविषयीची माहिती संस्थेचे सह-सचिव, मा.श्री. शिवरामजी काळे यांनी दिली.शेतामध्ये पिकांची लागवड करत असताना विद्यार्थी शिक्षक पालक यांनी 'भारत माता की जय'! 'झाडे लावा झाडे जगवा!' 'जवान जय किसान'! 'चांगल्या आरोग्यासाठीसेंद्रिय शेती फुलवा!'अशा घोषणा दिल्या.
कार्यक्रमाचे संयोजन: नारायण हट शिक्षण संस्थेचे सचिव, प्रा. डॉ. बाळासाहेब माशेरे व इतर संचालकांच्या मार्गदर्शनाखाली प्री- प्रायमरी शाळेच्या प्राचार्य, विजया चौगुले, सौ. सायली संत, सौ. मीनल बागुल, सौ. प्रतिभा तांबे, सौ. भाग्यश्री नगरकर, सुरेखाताई मुके, श्री. प्रवीण भाकड, यांनी केले. या कार्यक्रमाचा आनंद नारायण हट सोसायटीमधील सभासद, विद्यार्थ्यांचे पालक व सर्वसामान्य नागरिकांनी घेतला.
नारायण हट शिक्षण संस्थेच्या प्री- प्रायमरी शाळेत शिक्षणाबरोबर असे विविध प्रकारचे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये पालकांमध्ये अत्यंत आनंदी वातावरण असून शाळेचा नावलौकिक वाढत आहे. उपक्रमशील शाळा म्हणून परिसरात सर्वत्र या शाळेची चर्चा होत आहे.
कार्यक्रमाची सांगता 'वंदे मातरम'! गीताने झाली.

