shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

ऑल महा.फे.प्रा.शॉ.कि.फे. रेशन दुकानदार संघटनेचे विविध मागण्यांबाबत श्रीरामपूर तहसीलदारांना निवेदन...!

श्रीरामपूर (शौकतभाई शेख) : येथील श्रीरामपूर तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटना संलघ्न
ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शॉप किपर्स फेडरेशन पुणे (रजि). श्रीरामपूर शाखेच्यावतीने मा.तहसिलदार श्रीरामपूर यांच्या कार्यालयात नायब तहसीलदार यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

         यावेळी संघटनेचे तालुकाध्यक्ष माणिकराव जाधव, शिवाजी सैद, नरेंद्र खरात,संतोष वेताळ, विजय म्हस्के, प्रेम छतवानी आदी मान्यवर उपस्थित होते.
संघटनेच्यावतीने देण्यात आलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की,
१) धान्य दुकानातून वितरित केला जाणारा माल,गोदामातून धान्य दुकानात पोहचल्यावर पुढे ३० दिवस वाटपास परवानगी मिळावी, 
२) दुकान आय. एस. ओ. प्रमाणीकरण करण्याची सक्ती करण्यात येवू नये.
३)  सन २०२१ ते २०२२ पर्यत मोफत धान्य वाटपाचे कमिशन त्वरीत मिळावे.
अशा प्रकारच्या इतर अनेक मागण्याही या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

     ‌‌या निवेदनावर सोमनाथ देवकर, राहुल पगारे, मंगेश छतवानी, विकी काळे,विक्रांत क्षिरसागर, पप्पु तेलोरे, दिलिप त्रिभुवन, अतुल झिंरगे, प्रकाश गदिया.नरेंद्र खरात, भिका म्हस्के,अरुण खंडागळे,संगीता त्रिभुवन, आर. जी.काळे,सी.बी.गायकवाड, प्रेमकुमार छतवाणी, जे.एन. रणनवरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
close