सांगली : बागणी ता. वाळवा येथे साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०२ व्या जयंतीचे औचित्य साधून दिपगंगा भागीरथी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, सांगली. महाराष्ट्र राज्य या नोंदणीकृत राष्ट्रीय संस्थेकडून जिल्हा परिषद शाळा नं १ आणि २ तसेच बागणी व बागणी पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून, अनेक गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला. किमान ३५० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला.
साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती, सत्यशोधक विचार मंच आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर युवा मंच बागणी यांनी आयोजित केलेल्या भव्यदिव्य जयंती सोहळ्याच्या मा. महेश बावडेकरसर यांचे व्याख्यान झालेनंतर, दिपगंगा भागीरथी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा साहित्यिक समाजसेवक हिंदरत्न दिपक लोंढे म्हणाले की.. बागणी ही माझी जन्म व कर्मभूमी आहे.
मी इथल्या पांढरीत जगलो, वाढलो, शिकलो आणि आज एक साहित्यिक, समाजसेवक म्हणून अस्तित्वात आलो. येथील प्रत्येक माणसांबद्दल माझ्या ह्रुदयात मायेचा उम्हाळा आणि नाळेच एक अतूट नातं जोडलं गेलं आहे. त्यामुळे मी सदैव प्रत्येकांच्या ऋणात रहाणं पसंत करतो. ज्या मानव समाजात मी जन्माला त्या समाजातील प्रत्येक माणसांचं मी कांहीतरी देणं लागतो. ते जन्मभर न फिटणारे देणं मी अश्या सेवाभावी कार्यातून सतत देण्याचा प्रयत्न करेन. करत राहीन.
सदर कार्यक्रमाचे उदघाटन जिल्हा परिषद सदस्य मा. संभाजी कचरे आणि बागणी गावचे विद्यमान सरपंच मा. संतोष घनवट यांचे शुभ हस्ते झाले. उपसरपंच श्री. विष्णू किरतसिंग आणि सदस्य श्री. सतीश थोरात तसेच समाजसेविका अनाथांच्या नाथ सौ. शारदा लोंढे, जिल्हा परिषद शाळा बागणी नं. १ चे वरिष्ठ मुख्याध्यापक श्री. गोपीनाथ आडके, शाळा नं. २ च्या मुख्याध्यापिका सुरेखा पाटील आणि सर्व शिक्षक स्टाफ, कर्मचारी, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती उत्सव समितीचे श्री. अक्षय थोरात, श्री. भास्कर थोरात, सत्यशोधक विचार मंचचे श्री. सदाशिव वारेसर, श्री. रामदास थोरात, डॉ. बाबासाहेब आंबेडकर युवा मंच बागणीचे सर्व मान्यवर पदाधिकारी, सदस्य आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
या उपक्रमाला प्राचार्य डॉ. डी. जी. कणसेसर, श्री. अनिल भालेसर, श्री. राहुल नाईक, सौ. अर्चना मॅडम, सौ. सुमेधा दिवाण, कु. समीक्षा कांबळे, नेहा महामुनी, श्री. अक्षय माळी, कु. सिया शहा, श्री. अभय चौगुले यांचेकडून अनमोल मदत मिळाली. सदर कार्यक्रमास सर्वांचेच अनमोल सहकार्य लाभले. आयोजकांनी श्री. व सौ. लोंढे दाम्पत्यांचा भव्य सत्कार केला. उपस्थित सर्वांचे आभार मानले.

