shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वर्ल्ड वाईड बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये अमोल डाके याने अहमदनगरचे नाव कोरले



अमोल ने केल्या एक कोटी पेक्षा जास्त बीया संकलन

प्रतिनिधी : आसावरी वायकर

नगर : ४ /  दरवर्षी २८ जुलै रोजी जागतिक निसर्ग संवर्धन दिन पाळला जातो. जगाला निरोगी ठेवण्यासाठी पर्यावरण आणि नैसर्गिक संसाधने जतन करण्याच्या आवश्यकतेबद्दल जागरूकता निर्माण करण्यात येते .

अहमदनगर मधील युवा उद्योजक सारोळा बद्दी गावातील बीजपुत्र अमोल भगवान डाके यांनी कोरोना लॉकडाऊनच्या काळात ७३ प्रकारच्या झाडांचे एक कोटी पेक्षा जास्त झाडांच्या बिया जमा केल्या होत्या, जागतिक विक्रम करत वर्ल्ड वाईड बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये नाव नोंदवले आहे.

 जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनीही अमोल डाके याचे कौतुक करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या .

झाडांचे गावरान वाण शोधणे, बिया लागवड करणे, झाडांच्या बिया काढून त्या संकलित करणे, त्या इतरांना लावण्यासाठी देत त्यांना प्रेरणा देणे, वर्ल्ड वाईड बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये आपले नाव कोरले आहे. या उल्लेखनीय कामगिरीमुळे जगभरात अहमदनगर ची मान नक्कीच उंचावली आहे.
close