shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

तांदुळवाडी ग्रामपंचायत निवडणुकीतील नवनिर्वाचित सदस्यांचा माजी राज्यमंत्री प्राजक्तदादा तनपुरे यांच्याकडून सत्कार करून पुढील कार्यास दिल्या सुभेच्छा..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
सोमवार दिनांक ०८ ऑगस्ट २०२२

तांदुळवाडी ग्रामपंचायत निवडणुकीतील नवनिर्वाचित सदस्यांचा माजी राज्यमंत्री प्राजक्तदादा तनपुरे यांच्याकडून सत्कार करत राजकारणातून समाजकारण करावे असे आव्हान..!!

राहुरी : तांदुळवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत प्रस्थापीत नेत्यांना पराभूत करून निवडून आलेल्या नवनिर्वाचित सदस्यांचा आज माजी राज्यमंत्री प्राजक्तदादा तनपुरे ह्यांनी त्यांच्या संपर्क कार्यालयात सत्कार केला व नवनिर्वाचित सदस्यांना भावी कार्यास शुभेच्छा देऊन कौतुकही केले.

         तांदुळवाडी ग्रामपंचायतीची निवडणूक दोन दिवसापूर्वी होऊन ह्या निवडणुकीत सत्ताधारी प्रस्थापित नेत्यांच्या विरोधात गावातील सर्व सामान्य जनतेशी नेहमी संपर्क असणारी सम विचारी कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन जय तुळजाभवानी मंडळाची स्थापना केली होती. त्या मंडळाचे 9 उमेदवार विजयी होऊन ग्रामपंचायतीची सत्ता हस्तगत केली असून सेवा संस्थेच्या निवडणुकी पासून प्रस्थापित नेत्यांना धक्के देत ग्रामपंचायतीची सत्ता ताब्यात घेतली. अश्या या निवडून आलेल्या जय तुळजाभवानी मंडळाच्या नवनिर्वाचित सदस्यांचा माजी राज्यमंत्री प्राजक्तदादा तनपुरे ह्यांनी यथोचित सत्कार केला. 
     यावेळी निवडून आलेल्या सदस्यात गणपतराव पेरणे, शिवाजीराव खडके, विक्रम पेरणे, सौं विमल पेरणे, सौं शीतल पेरणे, सौं स्वाती विनीत धसाळ, सौं गायत्री पेरणे, पत्रकार सय्यद निस्सार ह्यांचा सत्कार केला. यावेळी नवनिर्वाचित सदस्यांना निवडून आणण्यात ह्यांनी प्रयत्न केले त्यात इंद्रभान पेरणे, विनीत धसाळ, नंदू पेरणे, गोरख खडके, गंगाधर पेरणे, भास्करराव पेरणे, जालिंदर खडके, रामभाऊ पेरणे, भाऊसाहेब तनपुरे, सुधीर धागुडे, चंद्रकांत हंडाळ, शोभाचंद संचेती, भाऊसाहेब पेरणे, उमेश पेरणे, सोमनाथ पेरणे, शामराव पेरणे, प्रल्हाद पेरणे व लक्ष्मणदादा पेरणे आदींचाही सत्कार श्री प्राजक्त तनपुरे ह्यांनी केला आणि राजकारणातून समाजकारण करावे असे आव्हान यावेळी त्यांनी केले.

       तसेच मागील महिन्यात पार पडलेल्या तांदुळवाडी सेवा संस्थेच्या निवडणुकीत विजयी झालेल्या नवनिर्वाचित संचालकांचाही सत्कार करण्यात आला त्यात गणपतराव पेरणे, गहिनीनाथ पेरणे, रवींद्र पेरणे, रेवन्नाथ पेरणे, रावसाहेब पेरणे, सौं ज्योती पेरणे व सौं बेबी पेरणे ह्यांचाही सत्कार केला.

Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600


close