shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कोकमठाण सप्ताहात भाविकांवर पुष्पवृष्टी!..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
सोमवार दिनांक ०८ ऑगस्ट २०२२

कोकमठाण सप्ताहात भाविकांवर पुष्पवृष्टी!..!!

कोपरगाव : श्री क्षेत्र कोकमठाण येथील सद्गुरू योगिराज गंगागिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहात भाविकांवर पोकलेन मशिनच्या सहाय्याने पुष्पवृष्टी करण्यात येत आहे.
सप्ताहात अनेक जण आपआपल्या परीने सेवा देतात, कुणी वाढपी होते, कुणी स्वच्छता करतात. वारकर्‍यांचा असणारा हा महाकुंभ श्रीक्षेत्र कोकमठाण येथे फुलून गेला आहे. दिवसागणिक या सप्ताहाला भाविकांची मोठी गर्दी होत आहे. कालही या सप्ताहाला 7 ते 8 लाख भाविकांनी भेट दिली. श्री क्षेत्र पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला होणारी गर्दी त्यानंतर वारकर्‍यांची गर्दी या सप्ताहाला होत आहे. आमटी भाकरीचा स्वाद घेण्यासाठी चिखल, गवताची तमा न करता आनंदाने आमटी भाकरीचा प्रसाद ग्रहण करण्यासाठी ओळीने बसणारे भाविक नजरेस पडतात.

एक मेकांना धुसफूस नाही, जय हरी माऊली करत एकमेकांना हसत मुखाने भेटणारे भाविक दिसतात. नगर, नाशिक, औरंगाबाद या जिल्ह्यांसह आजुबाजुच्या जिल्ह्यातील भाविक या सप्तहाला हजेरी लावतात. महंत रामगिरी महाराज यांच्या प्रवचनाची, किर्तनाची अविट गोडी भाविकांना लागते. लहानांपासून तर वृध्दांपर्यंत सप्तहाला हजेरी लावतात.


सद्गुरू योगिराज गंगागिरी महाराज यांनी दुष्काळी परिस्थिती मुळे सप्ताह त्या काळात सुरू केला. सर्वांनी एकत्र येऊन आमटी भाकरीचा प्रसाद ग्रहण करावा, या हायटेक जमान्यातही सप्तहाच्या या आमटी भाकरीला महत्त्व आहे. आमटी अन् बाजरी ची भाकरी पुर्वी असायची आता बाजरीचे क्षेत्र घटल्याने काही अंशी बाजरीच्या तोडीला चपात्या आल्या आहेत. सप्तहातील आमटीची चव न्यारीच असते. दिवसभरात पंगती सुरुच असतात. सप्ताहाच्या पंचक्रोशीतील मंडळी दिवसभर भाविकांच्या दिमतीला असतात. न थकता, उत्साहाने ते सप्ताहात आपले योगदान देतात. हे वाखणण्याजोगे आहे. सप्ताह कमिटी जवळपास सहा ते सात महिने सप्ताहाच्या कामात गुंतून जातात.

कोकमठाण सप्ताहात आजुबाजुची गावे, शेजारील तालुक्यांतील गावे ही आपआपल्या पध्दतीने योगदान देत असतात. लायन्स क्लब राहाता, साईयोगा मंडळय यांच्यावतीने काल सकाळी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यासाठी साईयोग मंडळाचे डॉ. बापूसाहेब पानगव्हाणे, लायन्स क्लब ऑफ राहाताचे संस्थापक अध्यक्ष दीपक दंडवते, डॉ. संजय उबाळे, राजेंद्र फंड, विनोद गाडेकर तसेच सर्व सदस्य उपस्थित होते. या सर्वांनी सप्ताहस्थळी स्वच्छतेसाठी योगदान दिले.

सप्ताहास येणार्‍या भाविकांवर पुष्पवृष्टी करण्यात येत आहे. आपल्या पोकलेन यंत्राद्वारे तालुक्यातील अस्तगाव येथील माऊली समर्थ अर्थमुव्हर्स कृषी डेव्हलपर्सचे संचालक मच्छिंद्र चोळके पाटील यांनी पोकलेनद्वारे सकाळपासून तर सायंकाळपर्यंत येणार्‍या भाविकांवर गुलाब आणि झेडूंच्या फुलांची पुष्पवृष्टी करत आहे. हा आगळा वेगळा उपक्रम मच्छिंद्र चोळके, राजेंद्र पटारे, पोपटराव लांडे या तीन मित्रांनी खास सप्तहासाठी राबविला आहे. पुष्पवृष्टी अंगावर पडताच भाविक त्यांना एक प्रकारे आशिर्वादच देत आहेत.

स्वत: फुले विकत घेऊन त्यांनी भाविकांसाठी हा उपक्रम राबविला आहे. भाविकांना फुले पडत असताना सेल्फी घेण्याचा मोह आवरत नाही. कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक हे पहिल्या दिवसापासून भाविकांना आपली शिट्टी वाजवत दिवसभर मुख्य प्रवेशद्वाराजवळ उभे राहून मार्ग मोकळा करून देतात. कडक ऊन, धूळ याची तमा न करता ते आपले कर्तव्य पार पडतात. यामुळे तेही या सप्तहात कौतुकाचा विषय ठरले आहेत.

Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600



close