shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जागतिक स्तनपान सप्ताह साजरा...!

अमरावती - आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र अमरावती येथे 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताहाचे औचित्य साधून संस्थेचे प्राचार्य मा.डॉ.डवले सर यांच्या मार्गदर्शनात विविध उपक्रमांनी जागतिक स्तनपान सप्ताह  साजरा करण्यात येत आहे.


            स्तनपानाचे महत्व या विषयाबाबत जनसामान्यांत जाणीव निर्माण करून त्याविषयीच्या शंका व गैरसमज दूर करणे. बाळाला योग्य वयात व पुरेसे स्तनपान देण्याबाबत मातांना माहिती देऊन प्रवृत्त करणे याबद्दल निबंध स्पर्धा,वक्तृत्व स्पर्धा,चित्र प्रदर्शन घेण्यात येत आहे.

             बाळाच्या आरोग्यासाठी आणि बालकांच्या शारीरिक व बौद्धिक विकासासाठी सुद्धा बाळास स्तनपान देणे फायद्याचे आहे.बाळाची वाढ व विकासविषयक गरज भागविण्यासाठी योग्य प्रमाणात प्रथिने,कर्बोदके, स्निग्ध पदार्थ,खनिजे,जीवनसत्वे आणि पाणी यासारख्या अन्न घटकांचे सर्वोत्तम संतुलन मातेच्या दुधामुळे बाळास प्राप्त होते.स्तनपान हे बाळाचे पहिले लसीकरण आहे असे मानले जाते त्यामुळे जंतुसंसर्गविरुद्ध संरक्षण मिळते.बाळाला त्याच्या वयाच्या पहिल्या सहा महिन्यापर्यंत फक्त आईचे दूधच द्यावे.

            जन्मानंतर लगेच अर्ध्या तासात बाळाला अंगावर पाजण्यास मातेने सुरुवात करण्याची गरज आहे.बाळाला स्तनपान लवकर सुरू करण्याने आई व बाळाचे भावनिक नाते निर्माण होते.ही बाळाचा विकास व शिक्षणाची पहिली पायरी आहे.

             स्तनपान सप्ताहाबद्दल सखोल मार्गदर्शन प्रशिक्षणार्थी बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी यांना देण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी मा.डॉ.बनसोड सर,आरोग्य पर्यवेक्षक तथा प्रशिक्षण समन्वयक श्री.डोंगरे सर,श्री.देशमुख सर,शर्मा मॅडम व आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र अमरावती येथील अधिकारी,प्रशिक्षणार्थी व सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेऊन सहकार्य केले.
close