शिर्डी । प्रतिनिधी(संजय महाजन) :-
भारतीय जनता पार्टीचे नेते, नामदार श्री. राधाकृष्णजीं विखे पाटील यांची राज्याच्या कॅबिनेट मंत्री पदी निवड झाल्याबद्दल आज भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा राहाता तालुक्याच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी भाजपा ओबीसी मोर्चा राहाता तालुकाध्यक्ष श्री स्वानंद रासने यांनी ना. विखे पाटील साहेबांचे काढलेले पेंसिल स्केच त्यांना सप्रेम भेट दिले. यावेळी भारतीय जनता पार्टी उत्तर नगर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष श्री राजेंद्र भाऊ गोंदकर, उपाध्यक्ष श्री अशोक भाऊ पवार यावेळी उपस्थित होते.

