शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे. रविवार दिनांक ०६ ऑगस्ट २०२२
जि. प. प्राथ.शाळा खडांबे खुर्द येथे स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव उपक्रमाचे भव्य आयोजन..!!
राहुरी : भारतीय स्वातंत्र्याला या वर्षी 75 वर्ष पूर्ण होत आहेत या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला जात आहे. जि. प. प्राथ.शाळा खडांबे खुर्द येथे गेले अनेक दिवसापासून वेगवेगळ्या आणि कल्पक उपक्रमाचे आयोजन करून देशाच्या गौरवशाली इतिहासाचे स्मरण केले जात आहे.
हर घर तिरंगा ,घर घर तिरंगा ,मन मन तिरंगा.
या उपक्रमाची भव्य दिव्य अंमलबजावणीसाठी , नागरिकांचे प्रबोधन करण्याचा दृष्टीने प्रभात फेरी काढून उपक्रमाची उत्साहात सुरवात केली.
याप्रसंगी मुलाच्या हातात तिरंगा ध्वज देऊन ढोल व घोषणांच्या निनादात प्रभात फेरी पूर्ण केली.यावेळी उपसरपंच तथा अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती प्रभाकर हरिश्चंद्रे ,अशोक खोमणे, विठ्ठल हरिश्चंद्रे ,सचिन कल्हापुरे ,दीपक मकासरे ,अजित हरिश्चंद्रे ,जॉनी पवार, लुमेश नन्नवरे, कल्पना नन्नवरे, उर्मिला दुबे, व शाळेचे शिक्षक मनीषा विप्रदास, मनीषा कोष्टी , मंदा कुलट, मारुती कुलट , रावसाहेब जाधव आदी मान्यवर व सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

