shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अडीच वर्षात मंत्री म्हणून तनपूरे यांनी चांगले काम केले त्याचा भविष्यात त्यांना फायदा होणार- आ. लंके..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
रविवार दिनांक ०६ ऑगस्ट २०२२

अडीच वर्षात मंत्री म्हणून तनपूरे यांनी चांगले काम केले त्याचा भविष्यात त्यांना फायदा होणार- आ. लंके..!!

आ. निलेश लंके यांच्याकडून आ. प्राजक्त तनपूरे यांच्या कार्याचे कौतुक..!!

राहुरी : आमदार प्राजक्तदादा तनपुरे ह्यांनी अडीच वर्षात मंत्री म्हणून अतिशय चांगल्या प्रकारे काम केले. ते एक अभ्यासू व्यक्तिमत्व असून भविष्यात त्यांना त्याचा फायदा होईल. असा विश्वास आमदार निलेश लंके ह्यांनी व्यक्त केला. आमदार निलेश लंके हे राहुरी तालुक्यात एका कार्यक्रमाचे निमित्ताने आले असता त्यांनी प्राजक्त तनपुरे ह्यांचे कार्यालयास भेट दिली असता कार्यकर्त्यांना मार्गदशन करत होते. 
         यावेळी जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे, तालुकाध्यक्ष एम. डी. सोनवणे, उपसभापती रवींद्र आढाव, दत्तात्रय पोपळघट, विलास तनपुरे, बाळासाहेब उंडे, नंदकुमार तनपुरे, सूर्यकांत भुजाडी आदि उपस्थितीत होते.

आमदार लंके यावेळी म्हणाले की, मी राष्ट्रवादीचा आमदार करण्यामध्ये माजी खासदार प्रसाद तनपुरे व आमचे मित्र बाळासाहेब बोठे ह्यांचा सिंहाचा वाटा आहे. मला शिवसेनेतून राष्ट्रवादीत आणून तनपुरे साहेब ह्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ह्यांना उमेदवारी देण्या बाबत सुचविले व मी आमदार झालो. एके काळी ह्याचा राहुरी तालुक्यातून राज्याचे मंत्री मंडळ ठरविले जात होते. हा इतिहास आहे. हे मी फक्त ऐकून होतो.

            आमदार प्राजक्त दादा तनपुरे हे अभ्यासू आमदार म्हणून त्यांचा नांव लौकिक असून त्यांच्या कडून बरेच शिकण्या सारखे आहे. राहुरी, नगर व पारनेर तालुके ह्यांचे प्रश्न एकच आहे. प्राजक्त तनपुरे ह्यांच्या कामाचे कौतुक केले.

कार्यक्रमास शहाजी जाधव, संदीप पानसंबळ, बाळासाहेब खुळे, राहुल शेटे, सचिन भिंगारदे, प्रकाश भुजाडी, दिलीप चौधरी, संजय साळवे, किरण पातोरे, कैलास शेटे, महेश उदावंत, आबासाहेब शेटे, रवींद्र तनपुरे, प्रवीण शिरसाठ, संतोष जगधने तसेच प्राजक्त तनपुरे ह्यांचे कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

           यावेळी तालुकाध्यक्ष एम. डी. सोनवणे ह्यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक शहराध्यक्ष संतोष आघाव ह्यांनी तर आभार ज्ञानेश्वर बाचकर ह्यांनी मानले.

Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600


close