shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

फेसबुक द्वारे शेतकऱ्यांना प्रलोभन देऊन मोठ्या आंब्यांच्या झाडांची विक्री करून शासनाची फसवणूक...!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
रविवार दिनांक ०६ ऑगस्ट २०२२

फेसबुक द्वारे शेतकऱ्यांना प्रलोभन देऊन मोठ्या आंब्यांच्या झाडांची विक्री करून शासनाची फसवणूक..!!

राहुरी : फेसबुक द्वारे शेतकऱ्यांना प्रलोभन देऊन मोठ्या आंब्यांच्या झाडांची विक्री करून शासनाची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी महेश शेळके याच्यावर शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. 
         राहुरी येथील कृषी अधिकारी महेंद्र रघूनाथ ठोकळे यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, दिनांक २५ जून २०२२ रोजी सायंकाळी सात वाजता जयकिसान एफ पी ओ या अकाऊंट वरून सूरत हैद्राबाद हायवे करीता शेतीमधील मुल्यांका करीता आवश्यक असलेली १० ते १५ फूट उंच व ३ ते ५ इंच बूंधा असलेली आंबा कलमे उपलब्ध आहेत. संपर्क जयकिसान हायटेक नर्सरी सुतगीरणी जवळ, नगर मनमाड रोड, राहुरी साखर कारखाना. मो. नं. ९९२२९३२००९ अशा अंब्यांच्या कलमांचे पाच फोटो फेसबुकवर विक्री करण्याच्या उद्देशाने पोस्ट टाकून आरोपी याने शासनाकडून जास्तीचा मोबदला मिळविण्या करीता सदर कलमे (फळझाडे) शेतीमध्ये लावण्याचे फेसबुक द्वारे शेतकऱ्यांना प्रलोभन देऊन मोठ्या अंब्यांच्या कलमांची विक्री करून शासनाची फसवणूक केली. असे फिर्यादीत म्हटले आहे. 

         कृषी अधिकारी महेंद्र रघूनाथ ठोकळे यांच्या फिर्यादीवरून आरोपी महेश शंकर शेळके, राहणार मानोरी, ता. राहुरी. याच्या विरोधात गुन्हा रजि. नं. ७२७/२०२२ भादंवि कलम ४२०, ४२६ प्रमाणे फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

        या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार ज्ञानदेव गर्जे हे करीत आहेत.
Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close