shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आजादी का अमृत महोत्सव निमित्त-कोरपना तहसील कार्यालय प्रांगणात वृक्षारोपण कार्यक्रम.!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी-किरण घाटे.
मंगळवार दिनांक ०९ ऑगस्ट २०२२


आजादी का अमृत महोत्सव निमित्त-कोरपना तहसील कार्यालय प्रांगणात वृक्षारोपण कार्यक्रम.!! 
चंद्रपूर : आजादी का अमृत महोत्सव या निमित्ताने आज मंगळवार दि.९ऑगस्टला कोरपना तहसील कार्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला.या कार्यक्रमाला कोरपनाचे तहसीलदार महेन्द्र वाकलेकर प्रामुख्याने उपस्थित होते .या वेळी तहसीलदार वाकलेकर यांचे सह निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार संजय भगत, मंडळ अधिकारी राजेंद्र पचारे ,या शिवाय तहसील कार्यालयातील कर्मचारी बांधवांनी वृक्षारोपण केले.
याच कार्यक्रमाच्या निमित्ताने या कार्यालयातील कु.शारदा गावंडे, आशा लांबट ,निशा सोयाम, रोशनी कोल्हे , व विनिता चव्हाण यांनी "आजादी का अमृत महोत्सव "ही सुंदररित्या रांगोळी रेखाटली.
या रांगोळीने अनेकांचे लक्ष वेधले होते. काहींनी तर त्यांचे या कलेचे तोंड भरुन कौतुक देखिल केले. हा आजादी का अमृत महोत्सव अत्यंत थाटात साजरा करण्यासाठी आज कार्यक्रमाची रूपरेषा आखण्यात आली.

Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @किरण घाटे चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी📲+91 92844 99128
close