shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अमेरिकेसारखे गुळगुळीत रस्ते ? नगर-मनमाड महामार्गावरील देहेरे टोलनाक्यावर लावलेले फलक सोशल मिडीयावर होतोय व्हायरल...!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
बुधवार दिनांक १० ऑगस्ट २०२२

अमेरिकेसारखे गुळगुळीत रस्ते ? नगर-मनमाड महामार्गावरील टोलनाक्यावर लावलेले फलक सोशल मिडीयावर होतोय व्हायरल...!!

नगर-मनमाड महामार्गाचा ठेकेदार पळून गेला की पळवून लावला, असा सवाल त्यांना फलकाद्वारे करण्यात आला आहे..!!

अहमदनगर : नगर-मनमाड महामार्गाची झालेली दुरवस्था सध्या चर्चेचा आणि ऐरणीवरचा मुद्दा आहे. मोठ्या प्रतीक्षेनंतर सुरू झालेले महामार्गाचे काम मध्येच बंद पडले. खोदून ठेवलेल्या रस्त्यातील खड्ड्यांचा आकार दरदिवशी विस्तारत असल्याने जीव मुठीत घेवून प्रवासाची वेळ वाहनधारकांवर आली आहे.

 
या महामार्गाच्या कामावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपही झाले. मंगळवारी दुपारी एकाने देहरे टोलनाक्यावर फलक लावून थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. या रस्त्याच्या दुरूस्तीबाबत नागरिकांना गडकरी यांच्याकडूनच अपेक्षा आहेत. भारतातील रस्ते अमेरिकेसारखे गुळगुळीत करणार, असे सांगता. मग नगर-मनमाड महामार्गाचा ठेकेदार पळून गेला की पळवून लावला, असा सवाल त्यांना फलकाद्वारे करण्यात आला आहे.

Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600


 

close