shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अखिल भारतीय काँग्रेस कमिटी आयोजित "आझादी गौरव पदयात्रा आज भिगवण येथे येणार - स्वप्निल सावंत.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटी आयोजित "आझादी गौरव पदयात्रा आज भिगवण येथे येणार - स्वप्निल सावंत.
इंदापूर प्रतिनिधी:भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त अखिल भारतीय काँग्रेस कमिटी आयोजित "आझादी गौरव पदयात्रा" ही पुणे जिल्ह्यात चालू आहे . ही यात्रा  इंदापूर तालुक्यात भिगवण येथे  दिनांक १० ऑगस्ट रोजी  संध्याकाळी ४ वा येणार आहे. सदर यात्रा भिगवण शहरातून मदानवाडी चौकात येणार आहे . यामध्ये जिल्हा अध्यक्ष आमदार संजय जगताप व भोरचे आमदार संग्राम थोपटे यांचा मार्गदर्शन होणार आहे . या मध्ये पुणे जिल्हा काँग्रेसचे प्रभारी विशाल पाटील , जेष्ठ नेते देविदास भन्साळी, सहप्रभारी उत्कर्षा  रूपावते,दादूसेठ खान , तसेंच जिल्ह्यातून विविध पद्धधिकारी उपस्तिथ राहणार आहेत.                  इंदापूर तालुका काँग्रेसच्या वतीने ह्या यात्रेचे स्वागत करण्यात येणार असल्याचे माहिती तालुकाध्यक्ष स्वप्निल सावंत यांनी दिली.
close